Jump to content

वारंगळ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वरंगल जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
वारंगळ जिल्हा
వరంగల్ జిల్లా(तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
वारंगळ जिल्हा चे स्थान
वारंगळ जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय वरंगल
मंडळ १३
क्षेत्रफळ
 - एकूण १,७६६ चौरस किमी (६८२ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण ७,१८,५३७ (२०११)
-लोकसंख्या घनता ४०७ प्रति चौरस किमी (१,०५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ६.९९%
-साक्षरता दर ६१.२६%
-लिंग गुणोत्तर १०००/ ९९४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ वारंगल
वाहन नोंदणी TS-24[]
संकेतस्थळ
वारंगळ किल्ला

वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. २०१६ साली वारंगल जिल्ह्याचे विभाजन करून हनमकोंडा जिल्हा व वारंगल ग्रामीण जिल्हा असे दोन जिल्हे निर्माण केले गेले. ऑगस्ट २०२१ मध्ये वारंगल ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून पुन्हा वारंगल जिल्हा असेच ठेवले गेले. आजच्या घडीला हनमकोंडा व वारंगल ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय हनमकोंडा येथेच आहे.

काकतीयच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘ओरुगल्लू’ किंवा एकशिला नगर असे होते. हा किल्ला एकाच दगडाने बांधला गेला आणि नंतर त्याला ‘वरंगल’ असे म्हणतात.[]

भूगोल

[संपादन]

वरंगल जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,७६६ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा महबूबाबाद, जनगांव, हनमकोंडा, मुलुगु आणि जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या वरंगल जिल्ह्याची लोकसंख्या ७,१८,५३७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.२६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ६.९९% लोक शहरी भागात राहतात.

वरंगल जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:

अनुक्रम वरंगल महसूल विभाग अनुक्रम चौटुप्पल महसूल विभाग
वरंगल चेन्नरावपेट
गीसुगोंडा दुग्गोंडी
खिल्लावरंगल १० खानापूर
पर्वतगिरी ११ नल्लबेल्ली
रायपर्ति १२ नरसंपेट
संगेम १३ नेक्कोंडा
वर्धन्नपेट

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Welcome to Warangal District | District Warangal , Government of Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-01 रोजी पाहिले.