Jump to content

अतुल कहाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतुल कहाते

अतुल कहाते ( : १९७३ - हयात) हे मराठी माहितीतंत्रज्ञ व लेखक आहेत.

लेखन

[संपादन]
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

अतुल कहाते यांनी संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, क्रिकेट, कारकीर्द मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी इंग्रजीमध्ये २०१८ सालापर्यंत २३ पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमांतही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते आयआयटी, सिंबायोसिस, इंदिरा, फर्ग्युसन, गरवारे अशा अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये `गेस्ट लेक्चरर` म्हणून विविध विषयांवर व्याख्याने देतात. लोकसत्ता, सकाळ, महारा‌ष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक प्रकाशनांमधून त्यांचे नियमित ले़खन सुरू असते. आयबीएन लोकमत, साम मराठी या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात.

अतुल कहाते यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अणुऊर्जा
  • अणुबॉम्ब
  • अंतराळ स्पर्धा
  • तुमचे आमचे स��पर हिरो अमर्त्य सेन
  • ॲमॅझाॅन : कथा सर्व काही इंटरनेटद्वारा विकणाऱ्या कंपनीची
  • अमेरिकी राष्ट्रपती : आजवरच्या अमेरिकी राष्ट्रपतींची अनोखी ओळख
  • Operating Systems (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
  • आय.टी. गाथा
  • आय.टी.तच जायचंय (सहलेखक - डॉ. श्रीराम गीत , विवेक वेलणकर)
  • इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी
  • Introduction to Database Management Systems (इंग्रजी)
  • इम्रान खान : प्लेबाॅय क्रिकेट खेळाडू ते पंतप्रधान
  • It Happens Only In I.T. (इंग्रजी)
  • उत्तर कोरिया- जगाला पडलेलं एक कोडं
  • XML and Related Technologies (इंग्रजी)
  • कहाणी 'फ्ल्यू' ची - इन्फ्ल्यूएन्झा ते स्वाइन फ्ल्यू
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव
  • केवळ ‘आयटी’.तच
  • क्रिकेट कसं खेळावं
  • Cryptography and Network Security (इंग्रजी)
  • गुगल : कथा माहितीच्या अजस्र कारखान्याची
  • गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा (सहलेखक अच्युत गोडबोले)
  • ‘च’ची भाषा
  • तुमचे आमचे झुंजार क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो
  • ट्‌विटर
  • Data Communications And Networks (इंग्रजी, सहलेखक अच्युत गोडबोले)
  • डोनाल्ड ट्रंप : जगाला पडलेलं महाभयानक स्वप्न
  • तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड
  • ध्यास जिंकण्याचा (मूळ लेखिका - साइना नेहवाल, मराठी अनुवाद - अतुल कहाते)
  • तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड : इंटरनेट, मोबाईल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या भीषण परिणामांचा हादरवून सोडणारा लेखाजोखा
  • तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती : भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा
  • वर्णद्वेश संपवणारा युगपुरुष - नेल्सन मंडेला
  • पॅलेस्टाईन इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष
  • पैसा
  • फिडेल कॅस्ट्रो
  • फेसबुक : यांनी जग बदललं, कथा माणसाला ऑनलाईन ओळख देणाऱ्या कंपनीची
  • बखर इंटरनेटची
  • बखर मोबाईल फोनची
  • बिटकॉइन  : आभासी चलनाची अद्‌भुत दुनिया
  • बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्ट
  • बोर्डरूम (सहलेखक अच्युत गोडबोले)
  • महामंदीच्या उंबरठ्यावर
  • महामंदीतून सुटका
  • महामंदी समजून घेताना : जागतिक आर्थिक महासंकटाचा थरकाप उडणवणारा लेखाजोखा
  • यांनी जग बदललं - ॲमेझॉन
  • यांनी जग बदललं - गुगल
  • यांनी जग बदललं - फेसबुक
  • रहस्य वंशवेलीचे
  • रुपेरी सिंधू
  • वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष नेल्सन मंडेला
  • वॉरेन बफे : पैशावर जिवापाड प्रेम करूनसुद्धा पैशाची अजिबात आसक्ती न बाळगणारा जगावेगळा माणूस
  • वॉरेन बफेच्या यशाचे ५० मंत्र : शेअर बाजारातील गुंतागुंत सहज सोप्या शब्दांत : वॉरेन बफेच्या यशाचे ५० मंत्र
  • Web Technologies (सहलेखक - अच्युत गोडबोले)
  • संकट आयसिसचे
  • सुपर हिरो - अमर्त्य सेन
  • तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती
  • शेअर बाजारातील गुंतागुंत सहज सोप्या शब्दांत
  • स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ! (सहलेखक - अच्युत गोडबोले)
  • अ‍ॅडॉल्फ हिटलर द ग्रेट डिक्टेटर

बाह्य दुवे

[संपादन]