मे ४
Appearance
(४ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४९३ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले.
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाला पोचला.
सतरावे शतक
[संपादन]- १६२६ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला.
अठरावे शतक
[संपादन]- १७१५ - पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध.
- १७९९ - श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला.
- १८५४ - भारतातील पहिले टपाल तिकिट प्रकाशित झाले.
- १८६९ - हाकोदातेची लढाई.
विसावे शतक
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९१० - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- १९१२ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले.
- १९२४ - १९२४ उन्हाळी ऑलिंपिक पॅरिसमध्ये सुरू.
- १९३० - ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हांबुर्ग जवळ नॉएनगामे कॉॅंसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.
- १९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र.
- १९४९ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार.
- १९५९ - पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.
- १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९७० - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी.
- १९७९ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
- १९९० - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- १९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार.
- १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
- १९९६ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी.
- १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
जन्म
[संपादन]- १००८ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
- ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.
- १६४९ - छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचा राजा.
- १६५४ - कांग्क्सी, चीनी सम्राट.
- १७६७ - त्यागराज, भारतीय संगीतकार.
- १८२५: ब्रिटिश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले
- १८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन
- १८४९: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले
- १९२८ - होस्नी मुबारक, इजिप्तचा पंतप्रधान.
- १९२९ - ऑड्रे हेपबर्न, ब्रिटिश अभिनेत्री.
- १९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम
- १९३४: भावगीत गायक अरुण दाते
- १९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक
- १९४१: परिमल डे- भारतीय फुटबॉलपटू
- १९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा
- १९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक
- १९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम.
- १९५७ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मार्टिन मॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - पॉल वाईझमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - डॅनियल क्रिस्चियन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - रवी बोपारा, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - मंजुरल इस्लाम, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १५०६ - हुसेन बयकराह, हेरतचा राजा.
- १७९९ - टिपू सुलतान.
- १९८० - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक कोळसा कामगार दिन.
- जागतिक अस्थमा दिन.
- स्मृती दिन - नेदरलँड्स.
- युवा दिन - चीन.
- स्वातंत्र्य दिन - लात्व्हिया.
- आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
- जागतिक दमा दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)