Jump to content

१९५० फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९५० फिफा विश्वचषक
IV Campeonato Mundial de Futebol
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा २४ जून१६ जुलै
संघ संख्या १५
स्थळ ६ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता उरुग्वेचा ध्वज उरुग्वे (२ वेळा)
उपविजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिसरे स्थान स्वीडनचा ध्वज स्वीडन
चौथे स्थान स्पेनचा ध्वज स्पेन
इतर माहिती
एकूण सामने २२
एकूण गोल ८८ (४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,४३,५०० (४७,४३२ प्रति सामना)

१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझिल देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८ च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझिलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेप��ासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

पात्र संघ

[संपादन]

दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनीजपानला ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते. तसेच पूर्व युरोपातील सर्व देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. आशिया गटामधून बर्मा, फिलिपाईन्स व इंडोनेशियाने असमर्थता दाखल्यामुळे भारत देशाला विश्वचषकात खेळण्याची प्रथमच पात्रता मिळाली.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताने प्रवासखर्च, संघाला सरावाचा अभाव व संघनिवडीच्या समस्या इत्यादी कारणांस्तव ह्या स्पर्धेमधून अंग काढून घेतले. फ्रान्सने देखील प्रवासखर्चाचे कारण दाखवत ह्या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. ह्यामुळे केवळ १३ देशांचे संघ ह्या स्पर्धेत खेळले.

यजमान शहरे

[संपादन]

ब्राझिलमधील सहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

रियो दि जानेरो साओ पाउलो बेलो होरिझोन्ते
माराकान्या Estádio do Pacaembu Estádio Sete de Setembro
26°14′5.27″S 27°58′56.47″E / 26.2347972°S 27.9823528°E / -26.2347972; 27.9823528 (Soccer City) 33°54′12.46″S 18°24′40.15″E / 33.9034611°S 18.4111528°E / -33.9034611; 18.4111528 (Cape Town स्टेडियम) 29°49′46″S 31°01′49″E / 29.82944°S 31.03028°E / -29.82944; 31.03028 (Moses Mabhida स्टेडियम)
क्षमता: 199,854 क्षमता: 60,000 क्षमता: 30,000
कुरितिबा पोर्तू अलेग्री रेसिफे
23°55′29″S 29°28′08″E / 23.924689°S 29.468765°E / -23.924689; 29.468765 (Peter Mokaba स्टेडियम) 25°27′42″S 30°55′47″E / 25.46172°S 30.929689°E / -25.46172; 30.929689 (Mbombela स्टेडियम) 29°07′02.25″S 26°12′31.85″E / 29.1172917°S 26.2088472°E / -29.1172917; 26.2088472 (Free State स्टेडियम)
Estádio Vila Capanema Estádio dos Eucaliptos Estádio Ilha do Retiro
क्षमता: 10,000 क्षमता: 20,000 क्षमता: 10,000
[ चित्र हवे ]

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये १५ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. बाद फेरीऐवजी सर्वोत्तम चार संघांमध्ये पुन्हा एकदा साखळी फेरी खेळवली गेली. ह्या अंतिम साखळीमधील सर्वोत्तम संघाला विजेतेपद देण्यात आले.

अंतिम साखळी फेरी निकाल

[संपादन]
संघ सा वि गोनों गिवि गू
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 2 1 0 7 5 5
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3 2 0 1 14 4 4
स्वीडनचा ध्वज स्वीडन 3 1 0 2 6 11 2
स्पेनचा ध्वज स्पेन 3 0 1 2 4 11 1

बाह्य दुवे

[संपादन]