सांगली संस्थान
Appearance
सांगली संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ सन १९०१ मध्ये २,८८० चौरस किमी इतके होते. सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता.
राजधानी
[संपादन]सांगली संस्थानाची राजधानी 'सांगली' या नगरात होती. सांगली हा शब्द 'सहा गली(सहा गल्ल्या)' या शब्दाचा अपभ्रंश आहे.
संस्थानिक
[संपादन]सांगली संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते. ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. येथील संस्थानिक सुरुवातीच्या काळात 'राव' ही पदवी वापरत. नंतर त्यांनी 'राजा' ही पदवी वापरायला सुरुवात केली.