संघचारी टिटवी
Appearance
संघचारी टिटवी किंवा सार्थवाहक टिटवी (इंग्लिश:sociable lapwing; हिंदी: संधी टिटिरी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी मध्यम आकाराच्या गाव-तितीराएवडा असतो. डोके तपकिरी कप��ळ पिवळट पांढरे असते. डोळ्यामागून निघालेला पांढरा पट्टा खाली माने पर्यंत जातो. डोळा आणि कानाला जोडणारी तपकिरी पट्टी असते. शेपटी आणि पाठीखालचा भाग पांढरा असतो. त्याची हनुवटी व गळा पांढरा शुभ्र असतो. छाती दुरकात करडी असत. आणि पाय काळे असतात.
वितरण
[संपादन]हे पक्षी हिवाळी पाहुणे असतात. पाकिस्तान, वायव्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तर बिहार, दक्षिणेकडे राजस्थान, गुजरात आणि काही भटके पक्षी केरळ आणि श्रीलंकेत आढळतात .
निवासस्थाने
[संपादन]ते उजाड माळराने आणि शेतीचा प्रदेश या भागात आढळतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली