Jump to content

रेजिना किंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Regina King (es); Regina King (hu); Regina King (eu); Regina King (ast); رجینا کینق (azb); Regina King (gl); Regina King (de); Ρετζίνα Κινγκ (el); Рэджына Кінг (be); رجینا کینگ (fa); 蕾吉娜·金恩 (zh); Regina King (da); Regina King (tr); レジーナ・キング (ja); Regina King (mul); Regina King (uz); ريجينا كينج (arz); Regina King (ga); רג'ינה קינג (he); Regina King (ig); 雷吉納·金 (zh-hant); 雷吉纳·金 (zh-cn); Regina King (cy); Regina King (fi); ریجنا کنگ (ur); Ռեջինա Քինգ (hy); Regina Kingová (cs); Regina King (pap); Regina King (it); রেজিনা কিং (bn); Regina King (fr); Regina King (nl); റെജീന കിംഗ് (ml); Regina King (nn); Regina King (id); Regina King (ms); Regina King (sv); Regina King (yo); 레지나 킹 (ko); Regina King (vi); Реджина Кинг (ru); Regina King (sq); Regina King (af); Реџина Кинг (sr); Regina King (sl); Regina King (pt); Regina King (pt-br); रेजिना किंग (mr); Regina King (lb); Regina King (pl); Regina King (nb); Regina King (sh); Реджина Кінг (uk); Regina King (gor); Regina King (ca); Реджина Кинг (bg); Regina King (en); ريجينا كينغ (ar); 雷吉纳·金 (zh-hans); रेजिना किंग (hi) actriz estadounidense (es); amerikai színésznő (hu); actriu i productora estatunidenca (ca); actores a aned yn 1971 (cy); ban-aisteoir agus stiúrthóir scannán Meiriceánach (ga); بازیگر آمریکایی (fa); американска актриса (bg); amerikansk skuespiller (da); Amerikalı film yönetmeni ve sinema oyuncusu (tr); アメリカ合衆国の女優、テレビドラマ監督 (ja); amerikansk skådespelare (sv); שחקנית אמריקאית (he); Onye Amerika na eme Ihe nkiri bụrụkwa onye isi ihe nkiri (ig); अमेरिकी अभिनेत्री और निर्देशक (hi); yhdysvaltalainen näyttelijä (fi); americká herečka a režisérka (cs); aktor merikano (pap); attrice e regista statunitense (it); actrice américaine (fr); އެމެރިކާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); American actress and director (born 1971) (en); ator (pt); pemeran perempuan asal Amerika Serikat (id); US-amerikanische Schauspielerin (de); Òṣèré Ọmọ Orílẹ̀-èdè America (yo); амерыканская актрыса і рэжысёр (be); amerikansk skodespelar (nn); amerikanesch Schauspillerin (lb); amerykańska aktorka (pl); amerikansk skuespiller (nb); Amerikaans actrice (nl); американська акторка (uk); artis lo Amerka Serikat pilotutu 1971 (gor); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); അമേരിക്കന്‍ ചലചിത്ര നടന്‍ (ml); American actress and director (born 1971) (en); ممثلة أمريكية ومخرجة (ar); Αμερικανίδα ηθοποιός (el); அமெரிக்க நடிகை மற்றும் இயக்குனர் (ta) Regina Rene King (it); Regina Rene King (fr); Regina Rene King (eu); Regina Rene King (ms); Regina Rene King (de); Regina Rene King (vi); 瑞吉娜·金, 里賈納·金, 雷吉娜·金, 雷吉纳·金 (zh); Regina Rene King (tr); Regina Rene King (id); Regina Rene King (en); Regina Rene King (ig); 레지나킹 (ko); Regina Rene King (hu); Regina Rene King (es); Regina Rene King (fi); Regina Rene King (gl); ريجينا رينيه كينغ (ar); Regina King (cs); Кинг, Реджина (ru)
रेजिना किंग 
American actress and director (born 1971)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावRegina King
जन्म तारीखजानेवारी १५, इ.स. १९७१
लॉस एंजेलस
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८५
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • University of Southern California
  • Westchester Enriched Sciences Magnets
व्यवसाय
मातृभाषा
उल्लेखनीय कार्य
  • The Boondocks
पुरस्कार
  • BET Award for Best Actor & Actress (इ.स. २००५)
  • NAACP Image Award for Outstanding Supporting Actress in a Motion Picture (इ.स. २००५)
  • Critics' Choice Television Award (इ.स. २०१७)
  • Academy Award for Best Supporting Actress (इ.स. २०१९)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २०१८)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २०२०)
  • Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २०१५)
  • Primetime Emmy Award for Outstanding Supporting Actress in a Miniseries or a Movie (इ.स. २०१६)
  • Golden Globe Award for Best Supporting Actress – Motion Picture (इ.स. २०१९)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रेजिना रेने किंग (जन्म १५ जानेवारी १९७१) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिला अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि चार प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत.[] २०१९ मध्ये, टाइम मासिकाने तिला जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नोंदवले होते.[]

२२७ (१९८५-१९९०) या दूरचित्रवाणी मालिकेत ब्रेंडा जेनकिन्सच्या भूमिकेसाठी किंगने प्रथम प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तिच्या त्यानंतरच्या भूमिकांमध्ये फ्रायडे (१९९५), ॲनिमेटेड मालिका द बूनडॉक्स (२००��-२०१४), आणि क्राइम दूरचित्रवाणी मालिका साउथलँड (२००९-२०१३) यांचा समावेश होता. तिला एबीसी अँथॉलॉजी मालिका अमेरिकन क्राइम (२०१५-२०१७), नेटफ्लिक्स लघु मालिका सेव्हन सेकंद आणि एचबीओ मालिका वॉचमन (२०१९) मधील तिच्या भूमिकांसाठी चार प्राइमटाइम एम्मी पुरस्कार मिळाले. तिच्या इतर दूरचित्रवाणी भूमिकांमध्ये ड्रामा मालिका द लेफ्टओव्हर्स (२०१५–२०१७) आणि सिटकॉम द बिग बँग थिअरी (२०१३–२०१९) यांचा समावेश आहे.

बॉईज एन द हूड (१९९१), पोएटिक जस्टिस (१९९३), ए थिन लाइन बिटवीन लव्ह अँड हेट (१९९६), हाऊ स्टेला गॉट हर ग्रूव्ह बॅक (१९९८), आणि रे (२००४), या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. तसेच डाउन टू अर्थ (२००१), लीगली ब्लॉन्ड २: रेड, व्हाईट अँड ब्लोंड (२००३), अ सिंड्रेला स्टोरी (२००४), आणि मिस कॉन्जेनिलिटी २: आर्म्ड अँड फॅब्युलस (२००५) या कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील तिचे पात्र आहेत. इफ बील स्ट्रीट कुड टॉक या २०१८ मधील चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवून समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. त्यानंतर तिने द हार्डर दे फॉल (२०२१) मध्ये काम केले आहे.

किंगने २०१५ आणि २०१६ मध्ये स्कँडल आणि २०१७ मध्ये दिस इज अस यासह अनेक दूरचित्रवाणी शोसाठी अनेक भागांचे दिग्दर्शन केले आहे. तिने २०१० मध्ये जेहेमच्या " फाइंडिंग माय वे बॅक " गाण्यासाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केला आहे. किंगच्या चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण २०२० मधील वन नाईट इन मियामी... या चित्रपटाद्वारे झाला. ह्याने तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि फर्स्ट टाइम फीचर फिल्मसाठी डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्डसाठी नामांकन मिळालं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही दुसरी कृष्णवर्णीय महिला ठरली.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

रेजिना रेने किंगचा जन्म १५ जानेवारी १९७१,[] लॉस एंजेलिस काउंटी, कॅलिफोर्निया येथे झाला.[] ती व्ह्यू पार्क-विंडसर हिल्समध्ये मोठी झाली. तिचे पूर्वज गुलाम व्यापाराचा भाग होते व मुळचे सिएरा लिओन, लायबेरिया आणि सेनेगल येथील होते. तिचे आईवडील मात्र दोघेही दक्षिण अमेरिकेतील आहेत.[] तीची आई ग्लोरिया जीन (शिक्षक) आणि वडील थॉमस हेन्री किंग जूनियर (इलेक्ट्रीशियन) आहे.[][] तिच्या पालकांचा १९७९ मध्ये घटस्फोट झाला.[] तिची धाकटी बहीण माजी अभिनेत्री रीना किंग आहे, जी व्हॉट्स हॅपनिंग नाऊ!! या कार्यक्रमात दिसली होती.

किंगने वेस्टचेस्टर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले व १९८८ मध्ये पदवी प्राप्त केली.[] तिने नंतर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये कम्युनिकेशन्सचा अभ्यास केला, जेव्हा तिला अभिनयाची आवड लक्षात आली व दोन वर्षांनी अभ्यास सोडला.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

किंगचे लग्न इयान अलेक्झांडर सीनियरशी १९९७ ते २००७ पर्यंत होते. त्यांचा मुलगा, इयान अलेक्झांडर जुनियर, जो १९९६ मध्ये जन्मला आणि नंतर डिस्क जॉकी आणि रेकॉर्डिंग कलाकार बनला. [१०] २१ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी तिच्या मुलाने आत्महत्या केली.[११][१२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Brown, Tracy (September 21, 2020). "Regina King ties record for most acting Emmys won by a Black performer". Los Angeles Times. September 21, 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Davis, Viola (April 17, 2019). "Regina King". Time. April 10, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 17, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Cho, Diane J. (February 26, 2021). "History-Making Golden Globe Nominee Regina King: Her Unrivaled Career in Photos". People. October 29, 2023 रोजी पाहिले.
  4. ^ a b Stated on Finding Your Roots, April 12, 2022
  5. ^ Stewart, Chelsea (August 4, 2023). "Jennifer Garner Is Going Viral After Her Question About Regina King's Family Ancestry Resurfaced Online". Buzzfeed. August 6, 2023 रोजी पाहिले.
  6. ^ Stated on Who Do You Think You Are?, December 17, 2018
  7. ^ "Regina King profile at Yahoo! Movies". June 29, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 2, 2018 रोजी पाहिले.
  8. ^ 1988 Westchester High School Yearbook (Los Angeles, California)
  9. ^ "The scene stealer". Vulture. July 31, 2019 रोजी पाहिले.
  10. ^ {{स्रोत बातमी|last=Tillet|first=Salamishah|url=https://www.nytimes.com/2021/01/15/movies/regina-king-one-night-in-miami.html%7Ctitle=Regina King: Speaking Truth to Power Through Her Art|date=January 15, 2021|work=[[The न्यू यॉर्क टाइम्स|url-access=limited|archive-url=https://ghostarchive.org/archive/20211228/https://www.nytimes.com/2021/01/15/movies/regina-king-one-night-in-miami.html%7Carchive-date=December 28, 2021}}
  11. ^ Thomas, Megan; Alonso, Melissa (January 23, 2022). "Regina King mourns the death of her son". CNN. January 23, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 23, 2022 रोजी पाहिले.
  12. ^ Campione, Katie (January 22, 2022). "Regina King's Son Ian Alexander Jr. Dies by Suicide: He 'Cared So Deeply'". People. January 22, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 22, 2022 रोजी पाहिले.