Jump to content

मराठी बौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी, नागपूर येथे जमलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी

मराठी बौद्ध किंवा महाराष्ट्रीय बौद्ध हा महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषिक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्यात ६५ लाख बौद्ध असून यातील ९९% पेक्षा अधिक बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध आहेत. तर सुमारे ५३ लाख बौद्ध हे अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहेत. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे.

इतिहास

[संपादन]

१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. इ.स. १९५१च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ (०.०१%) होती. आणि इ.स. १९६१ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ (७%) झाली. यात प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला होता. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही १६% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) सुद्धा म्हणले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आहेत.

उल्लेखनीय व्यक्ती

[संपादन]
  1. बाबासाहेब आंबेडकर
  2. सविता आंबेडकर
  3. दादासाहेब गायकवाड
  4. यशवंत आंबेडकर
  5. नरेंद्र जाधव
  6. प्रकाश आंबेडकर
  7. रामदास आठवले
  8. यशवंत मनोहर
  9. भालचंद्र कदम
  10. सिद्धार्थ जाधव
  11. भरत जाधव
  12. आनंद शिंदे
  13. आदर्श शिंदे
  14. अभिजीत सावंत
  15. विठ्ठल उमप
  16. नंदेश उमप
  17. रा.सु. गवई
  18. पंढरीनाथ कांबळे
  19. लक्ष्मण माने
  20. उत्तम खोब्रागडे
  21. नामदेव ढसाळ
  22. प्रल्हाद शिंदे
  23. वामन कर्डक
  24. जोगेंद्र कवाडे
  25. अभिजीत कोसंबी
  26. दया पवार
  27. प्रज्ञा पवार
  28. बाबुराव बागुल
  29. शांताबाई कांबळे
  30. एकनाथ आवाड
  31. सुखदेव थोरात
  32. भालचंद्र मुणगेकर
  33. राजकुमार बडोले
  34. सुरेखा पुणेकर
  35. अरुण कांबळे
  36. अर्जुन डांगळे
  37. गंगाधर पानतावणे
  38. वैशाली माडे
  39. नितीन राऊत
  40. मुकुल वासनिक
  41. चंद्रकांत हंडोरे
  42. सुलेखा कुंभारे
  43. वर्षा गा��कवाड
  44. संजय गायकवाड
  45. संजय बनसोडे
  46. सुधाकर श्रृंगारे
  47. सुनील गायकवाड
  48. गौरव मोरे
  49. भिक्खू संघरत्न

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]