Jump to content

भोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोर हे पुणे जिल्ह्यातील एक भोर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. म्हाळवडी हे गाव पुणे जिल्हा मुख्यालय येथून 55 किमी अंतरावर असून भोर पासून 5 किमी अंतरावर असलेले म्हाळवडी हे गाव अभ्यासाचे गाव म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसेच या गावात बिनविरोध निवडणूक, बाहेरील व्यक्तींना जागा विकत घेण्यास निर्बंध यामुळे म्हाळवडी गावचे तालुक्यात आघाडीचे गाव म्हणुन नाव घेतले जाते भोर चे आराध्य दैवत खिळोबा देवाचे मंदिर म्हाळवडी गावातील डोंगरात आहे

भौगोलिक माहिती

[संपादन]
 भोर हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. भोर हे शहर सह्याद्री पर्वत रांगांच्या मध्ये वसलेले आहे येथे भाटघर धरण आहे तसेच रोहिडा किल्ला,राजगड किल्ला ही पर्यटन स्थळे भोर जवळच आहेत. ब्रिटिश काळापासून भोर शहराला महत्त्व आहे तसेच ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक वाडे,वास्तू पाहायला मिळतात. 
 भोर शहराचे कामकाज नगरपरिषद पाहते. पुणे शहरापासून भोर 55 कि.मी अंतरावर आहे.

इतिहास

[संपादन]

भोर हे डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या अधिपत्याखालील एक संस्थान होते. भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान ्होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावाना चहूबाजूंच्या डोंगरांमुळे निसर्गसौन्दर्य लाभले आहे. भोरमध्ये काही चांगल्या शिक्षणसंस्था आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शप्पथ घेतली तो रायरेश्वर किल्ला देखील भोर मध्येच आहे भोर तालुकयात धुमाळ-देशमुख हे घराणे इतिहासापासून प्रसिद्ध आहे, शिवकाळात धुमाळांचे पुर्वज श्रि.बाबासाहेब डोहर यांना भोरच्या उत्तरेकडे आणि पुर्वेकडे वतन मिळाले होते. पुढे डोहर-देशमुख नावाचे धुमाळ देशमुख रुढ झाले. तसेच कान्होजी जेधे, बांदल, गोळे, शिळीमकर, गायकवाड,थोपटे, बोडके, सुर्यवंशी इत्यादी शिवकालीन घराणी प्रसिद्ध आहेत.

पर्यावरण

[संपादन]

वेळवंडी नदीवरील भाटघर धरण येथून जवळ आहे.

सामाजिक माहिती

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.