प्रजासत्ताक
Appearance
प्रजासत्ताक अथवा गणराज्य (इंग्लिश: Republic) हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे.
प्रजासत्ताक हा शब्द प्रामुख्याने सार्वभौम देशांसाठी वापरला जात असला तरीही अने��� देशांचे उपविभाग देखील प्रजासत्ताक असू शकतात. उदा: भूतपूर्व सोव्हिएत संघामधील युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य.
प्रकार
[संपादन]- सांसदीय प्रजासत्ताकः भारत, दक्षिण आफ्रिका, जर्मनी इत्यादी देश जेथे राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख हे वेगळे आहेत.
- संघीय प्रजासत्ताकः आर्जेन्टिना, रशिया, अमेरिका इत्यादी देश जेथे विविध प्रांत अथवा राज्यांची वेगळी सरकारे आहेत.
- इस्लामिक प्रजासत्ताकः पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण व मॉरिटानिया हे देश इस्लामिक प्रजासत्ताके आहेत जेथे शारिया कायद्याने राज्यकारभार चालतो.
- साम्यवादी प्रजासत्ताकः चीन, व्हियेतनाम इत्यादी देश जेथे लोकशाही आहे परंतु निवडणुका होत नाहीत.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत