Jump to content

धनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनगर

धनगर समाज हा १०८कुळी क्षत्रिय एक हिंदू जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो.[ संदर्भ हवा ] क्षत्रिय धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश,आसाम ,बिहार, मध्यप्रदेश, तेलंगाना , गुजरात,राजस्थान, जम्मू आणि काश्मीर,केरळ,तमिळनाडू,सिक्कीम ,पंजाब,उत्तराखंड,झारखंड, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश,मणीपूर , पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मेघालय, नागालँड,ओरीसा किंवा उडीसा मिझोरम राज्यांत राहतात.[ संदर्भ हवा ] मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती यशवंतराव होळकर, सम्राट (प्रथम) चंद्रगुप्त मौर्यसम्राट अशोक हे या समाजातील भारतीय राज्यकर्ते होते.[ संदर्भ हवा ] या समाजाचे दैवत जेजुरीचा खंडोबा, बिरोबा , बाळुमामा आहे.

आरक्षण

[संपादन]

सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात धनगर समाज हा भटक्या जाती – क (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो व त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.[ संदर्भ हवा ] कर्नाटकात धनगर समाज हा कुरुबा या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे संपुर्ण भारतात विविध नावाने ओळखला जातो,जसा

  • उत्तर-भारतात
    • दिल्ली- पाल बघेल धनगर गडरीया
    • उत्तरप्रदेश- पाल बघेल चंदेल धनगर गडरीया
    • हरियाणा - पाल बघेल होळकर गडरीया
    • हिमाचलप्रदेश-गडरीया गड्री गद्दी
    • राजस्थान- धनगर-गायरी धनगर-गाडरी धनगर-गारी धनगर-गड्री
  • मध्य-भारतात
    • मध्यप्रदेश-धनगर-गायरी धनगर-गारी धनगर-चौधरी
    • गुजरात- धनगर-रबारी , धनगर-मालधारी , धनगर-बागरी
    • महाराष्ट्र- धनगर -खुटेकर ,धनगर हटकर शेंगर अहिर गवळी-धनगर

गोवा-धनगर गवळी-धनगर घनगड

  • दक्षिण-भारतात
    • तेलंगणा- कुरुंबा कुरूबा
    • कर्नाटक- कुरुबा
    • तामिळनाडू- कुरुंबर कुरुंबा
    • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ऑर्डर (दुसरी दुरुस्ती) विधेयक, 2002 संदर्भात कामगार आणि कल्याणावरील स्थायी समितीच्या 27 व्या अहवालानुसार:[97]

समान नामकरण असलेले दोन भिन्न समुदाय आहेत, एक धनगड जो ओराँणचा उप-समूह आहे, अनुसूचित जमातीच्या सूचीच्या S.N..36 वर दिसणारी अनुसूचित जमाती आहे. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय शेती हा आहे. 'धनगर' म्हणून ओळखला जाणारा आणखी एक समुदाय आहे ज्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे गुरे पाळणे आणि लोकरीचे विणणे. 'धनगर' मेंढपाळ असलेल्या धनगरांना महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. म्हणून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (सुधारणा) अधिनियम, 1976 मध्ये कोणतीही छपाई चूक नाही ज्याद्वारे संविधान (अनुसूचित जमाती) आदेश, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली.

संस्कृती

[संपादन]

धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.[ संदर्भ हवा ] जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार, बिरोबाच्या नावानं चांगभलं हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.[ संदर्भ हवा ] धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात भंडारा उधळला जातो.[ संदर्भ हवा ] ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते. बापू बिरू वाटेगावकर, धनगरवाडा, ख्वाडा, बाळू मामांची गाथा या चित्रपटांतून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय मल्हार, श्री संत बाळूमामा या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

[संपादन]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, [माळव्याच्या]] 'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.[ संदर्भ हवा ]पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.[ संदर्भ हवा ]इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहि��्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हणले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल