दिलवाडा मंदिर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दिलवाडा मंदिरे ही भारतातील राजस्थान राज्यामधील माउंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी आहेत. ही एकूण पाच जैन मंदिरे भारतीय संगमरवरी कलाकुसरीची अत्युत्कृष्ट उदाहरणे आहेत. सर्व मंदिरांत आदिनाथांपासून ते महावीरांपर्यंतच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. जैन स्थापत्याचा एक सुंदर अविष्कार म्हणजे दिलवाडा येथील मंदिरे होत. अकराव्या बाराव्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेल्या या मंदिरांना स्थापत्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे जैन धर्मीयांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे स्थान आहे
मंदिरे बाहेरून पाहिल्यास अतिशय सामान्य वाटतात. कदाचित शतकानुशतके ऊन पाऊस झेलल्यामुळे तसे झाले असावे. परंतु मंदिरांत प्रवेश केल्यावर त्यांतली कलाकुसर पाहून माणूस दिपून जातो. दिलवाडाची ही मंदिरे ११ व्या ते १२ व्या शतकात गुजरातच्या सोळंकी राजकर्त्यांनी बांधली. अकराव्या बाराव्या शतकामध्ये निर्माण करण्यात आलेल्या या मंदिराची वैशिष्ट्ये स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत जैन मंदिरांमध्ये महत्त्वपूर्ण मानले जाणारे हे मंदिर आहे जेनी स्थापत्याची वैशिष्ट्ये येथे दिसून येतात
ताजमहालच्या संगमरवरी बांधकामाशी तुलना करता, ताजमहालची वास्तू म्हणून भव्यता आहे, तर दिलवाडाची मंदिरे संगमरवरावरील अतिशय बारीक कलाकुसरीत वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.