डेन्व्हर
डेन्व्हर Denver |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | अमेरिका | ||
राज्य | कॉलोराडो | ||
स्थापना वर्ष | नोव्हेंबर २२, इ.स. १८५८ | ||
क्षेत्रफळ | ४०१.३ चौ. किमी (१५४.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल ५,६८० फूट (१,७३० मी) किमान ५,१३० फूट (१,५६० मी) |
||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ६,००,१५८ | ||
- घनता | १,५११ /चौ. किमी (३,९१० /चौ. मैल) | ||
- महानगर | २५,५२,१९५ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०७:०० | ||
denvergov.org |
डेन्व्हर (इंग्लिश: Denver) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डेन्व्हर शहर रॉकी पर्वतरांगेच्या पायथ्याशी साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसले आहे. डेन्व्हरची समुद्रसपाटीपासूनची उंची बरोबर १.६ किमी किंवा १ मैल असल्यामुळे डेन्व्हरला माइल हाय सिटी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. २०१० साली ६ लाख लोकसंख्या असलेले डेन्व्हर अमेरिकेमधील २६व्या क्रमांकाचे मोठे शहर, तर २५.५ लाख वस्ती असलेले डेन्व्हर महानगर क्षेत्रांपैकी २१व्या क्रमांकाचे आहे.
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या शहरातील विमानतळ आहे.
राजकारण
[संपादन]डेन्व्हरचे महापौर येथील मुख्याधिकारी असतात. या पदाची मुदत चार वर्षांची असते.
डेन्व्हर शहर आणि काउंटी हे एकाच प्रशासनाखाली असून ही काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
वाहतूक
[संपादन]महामार्ग
[संपादन]इंटरस्टेट २५ आणि इंटरस्टेट ७० हे डेन्व्हर महानगरातून जाणारे प्रमुख महामार्ग आहेत. हे अनुक्रमाने उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम धावतात. याशिवाय इतर इंटरस्टेट महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांचे जाळे डेन्व्हरभर पसरलेले आहे.
- इंटरस्टेट २५ - वायोमिंग ते न्यू मेक्सिको जाणारा हा महामार्ग डेन्व्हर महानगरातून उत्तर-दक्षिण धावतो.
- इंटरस्टेट ७० - मेरीलॅंड ते युटा जाणारा हा रस्ता डेन्व्हर महानगरातून पूर्व-पश्चिम धावतो. डेन्व्हर व आसपासच्या प्रदेशांतून रॉकी माउंटनमध्ये जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे.
- इंटरस्टेट ७६ - डेन्व्हरच्या पश्चिमेस आर्व्हाडा शहरात आय-७० पासून सुरू होणारा हा महामार्ग कॉलोराडोच्या ईशान्य टोकापर्यंत जातो व नंतर नेब्रास्कामध्ये इंटरस्टेट ८०ला मिळतो.
- इंटरस्टेट २२५ - अरोरा शहरातून जाणारा हा रस्ता दक्षिण डेन्व्हरमध्ये आय-२५पासून ईशान्येकडे जात आय-७०ला जोडतो.
- इंटरस्टेट २७० - शहराच्या मध्यवर्ती भागाच्या ईशान्येस असलेला हा महामार्ग आय-७०ला उत्तरेस आय-२५शी जोडतो
- यूएस ६ - हा मॅसेच्युसेट्सच्या प्रॉव्हिन्सटाउनपासून कॅलिफोर्नियाच्या बिशप शहरापर्यंत जाणारा रस्ता डेन्व्हरच्या पूर्व भागात आय-७० बरोबर धावतो. मध्यवर्ती भागाच्या पश्चिमेस यूएस ६ वेगळा होउन सिक्स्थ ॲव्हेन्यू बरोबर धावतो आणि गोल्डन आणि लेकवूड या उपनगरांना जोडतो.
- यूएस २८५ - सॅंडरसन, टेक्सास येथे सुरू होणारा हा रस्ता डेन्व्हरच्या नैऋत्य भागातून युनिव्हर्सिटी हिल्स या भागात आय-२५ला मिळतो व तेथेच संपतो.
- यूएस ८५ - एल पासो, टेक्सास येथे मेक्सिकोच्या सीमेशी सुरू होउन फॉर्चुना, नॉर्थ डकोटा येथील कॅनडाच्या सीमेपर्यंत असा अमेरिकेच्या उत्तर-दक्षिण सीमांना जोडणारा हा रस्ता डेन्व्हर महानगराच्या पश्चिम भागातून उत्तर-दक्षिण जातो. हा रस्ता आय-२५ला साधारण समांतर आहे.
- यूएस ३६ - हा रस्ता रॉकी माउंटन राष्ट्रीय उद्यानात एस्टेस पार्कजवळ सुरू होणारा हा रस्ता बोल्डरमधून जात डेन्व्हरच्या वायव्य भागातून जातो. शहराच्या मध्यवर्ती भागात आय-७० आणि आय-२५ सह अनेक महामार्गांना काट देत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आय-७०ला मिळतो व पुढे ओहायोतील अहरिक्सव्हिलपर्यंत जातो.
- कॉलोराडो राज्य महामार्ग ९३ - हा रस्ता शहराच्या पश्चिम भागातील गोल्डन उपनगरात सुरू होतो व बोल्डरमध्ये राज्य महामार्ग ११९ला मिळतो. हा रस्ता यूएस ३६ला समांतर आहे.
- कॉलोराडो राज्य महामार्ग ४७० तथा सी-४७० हा शहराच्या पश्चिमेस रॉकी पर्वतांच्या पायथ्याशी सुरू होतो व दक्षिणेकडून महानगराला वळसा घालत आय-७०, आय-२५ला काट देत ई-४७०मध्ये रूपांतरित होतो.
- ई-४७० - सी-४७०पासून पुढे पूर्वेस आणि उत्तरेकडून गोल्डनपर्यंत जवळजवळ वर्तुळाकार बाह्यवळण असलेला हा रस्ता टोलरस्ता आहे.
सार्वजनिक वाहतूक
[संपादन]विमानतळ
[संपादन]डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (KDEN) येथील मुख्य विमानतळ आहे. हा शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३० किमी ईशान्य-पूर्वेस आहे. १३७ किमी२ इतक्या प्रदेशावर पसरलेला हा विमानतळ जगातील १८व्या तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.[१] विस्ताराच्या दृष्टीने हा अमेरिकेतील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[२][३] येथे युनायटेड एरलाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्सचे मोठे वाहतूकतळ आहेत. येथे फ्रंटियर एरलाइन्सचे मुख्यालय आणि वाहतूकतळ आहे.
महानगराच्या दक्षिण भागातील सेंटेनियल विमानतळ��चा (KAPA) वापर लांब पल्ल्याची खाजगी विमाने करतात तर रॉकी माउंटन मेट्रोपोलिटन विमानतळ (KBJC) आणि फ्रंट रेंज विमानतळांचा वापर छोटी खाजगी विमाने करतात.
बकली वायुसेना तळ हा अमेरिकेच्या वायुसेनेच्या वापरातील विमानतळ आहे.
स्टेपलटन विमानतळ आणि लाउरी वायुसेना तळ हे पूर्वीचे विमानतळ आता बंद असून दोन्ही ठिकाणी वस्ती करण्यात आलेली आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Passenger Traffic Reports". Denver International Airport. City & County of Denver Department of Aviation. December 4, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Which Airport Is The World's Biggest? And The Busiest?". flightmapping.com. December 28, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 24, 2012 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "How New York Works". How Stuff Works. September 26, 2007 रोजी पाहिले.