Jump to content

टेड स्टीवन्स अँकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ANCआप्रविको: PANCएफ.ए.ए. स्थळसूचक: ANC) हा अमेरिकेच्या अलास्का राज्यातील ॲंकरेज शहराचा प्रमुख विमानतळ आहे. उत्त�� अमेरिकेतील सगळ्यात उत्तरेस असलेला हा मोठा विमानतळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीचे मोठे केंद्र आहे. येथून युरोप आणि आशियाच्या उत्तर भागातील सगळी शहरे सहज पल्ल्यात आहेत. २०१२मध्ये २२,४९,७१७ प्रवाशांनी येथून ये-जा केली.

या विमानतळाला अलास्काच्या सेनेटर टेड स्टीवन्सचे नाव देण्यात आलेले आहे.