Jump to content

जगद्गुरु रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांगविश्वविद्यालय (संस्कृतभाषा: जगद्गुरूरामभद्राचार्यविकलाङ्गविश्वविद्यालयः), हे भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट धाम येथे असलेले अपंगांसाठीचे विद्यापीठ आहे. हे अपंगांसाठीचे जगातील सर्वप्रथम विद्यापीठ आहे. [][] [][] या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्त्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्सओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. प्रवेश फक्त चार प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे – अंध , मूकबधिर, अस्थिविकलांग (पंगु अथवा भुजाहीन), व मानसिक विकलांग, ( भारत सरकारच्या विकलांगता अधिनियम १९९५ अनुसार) . या विदयापीठाचा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरिक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा - म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत.

दूरस्थ शिक्षण

[संपादन]

सीमित गतिशीलता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विदयापीठ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम ऑनलाइन प्रदान करतो, जो दूरस्थ शिक्षा परिषद, इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विदयापीठ, नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "About JRHU". Jagadguru Rambhadracharya Handicapped University. 2009-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 21, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ Shubhra (February 12, 2010). "जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय". Bhāratīya Pakṣa. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-07-21. April 25, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ Subhash, Tarun (July 3, 2005). "A Special University for Special Students: UP does a first – it establishes the country's first exclusive university for physically and mentally disabled students". Hindustan Times. 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 23, 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Dikshit, Ragini (July 10, 2007). "चित्रकूट: दुनिया का प्रथम विकलांग विश्वविद्यालय". Jansatta Express.
  5. ^ "Distance Education Centre (Recognized by DEC, IGNOU New Delhi)". Shri Tulsi Peeth Seva Nyas. 2011-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 29, 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]