चर्चा:महाराष्ट्राचा इतिहास
या लेखात असलेली माहिती महाराष्ट्र मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस 08:34, 2 डिसेंबर 2006 (UTC)
हे पान काढू नये
[संपादन]"महाराष्ट्राचा इतिहास" हा महाराष्ट्र वर वाजवीपेक्षा मोठा विभाग होईल. तिथे थोडी माहिती देऊन या पानावर सखोल विवरण द्यावे. किंबहुना या पानाचेच नंतर अनेक पानात विभाजन करावे लागेल इतके ते मोठे होऊ शकते.
– केदार {संवाद, योगदान} 09:27, 2 डिसेंबर 2006 (UTC)
ठीक आहे परंतु महाराष्ट्र लेख विस्तृत असावा असे माझे मत आहे. इतिहास हा विभाग महाराष्ट्रातही मोठा असावा.महाराष्ट्र एक्सप्रेस 09:32, 2 डिसेंबर 2006 (UTC)
बरोबर
[संपादन]केदार म्हणतायत तोच मुद्दा माझ्याही मनात आला. 'महाराष्ट्राचा इतिहास' म्हटल्यावर, किंबहुना 'इतिहास' म्हटल्यावर वेगवेगळ्या राजवटींचा इतिहास, लढाया, क्रांत्या यांनी मजकूर भरून जातो. परंतु याखेरीज त्या स्थानाचा प्रागैतिहासिक कालखंडापासून काही इतिहास संशोधनांती उजेडात आला असेल तर तसा इतिहास, जुने शिलालेख-ताम्रपट-हस्तलिखिते-जुन्या काळी वापरात असलेल्या विविध लिप्या याआधारे भाषिक इतिहास, बलुतेदारी-गावगाडा-समाजव्यवस्था-तत्कालीन उद्योगधंदे/उत्पादने-राहणीमान असा सामाजिक अंगाने इतिहास, विविध लोककला-संगीत-नृत्य-चित्र/शिल्प/स्थापत्य आदी अभिजात कला-अभियांत्रिकी उपक्रम इत्यादी अंगाने सांस्कृतिक इतिहास.. असे बहुआयामी इतिहासविषय हाताळले गेले पाहिजेत. तसेच शस्त्रास्त्रप्रगती, युद्धतंत्रे, तत्कालीन करयोजना (tax schemes), नाणी किंवा इतर विनिमयाच्या वस्तूंचा वापर, टपाल/इतर संदेशवहनयंत्रणा, सामान्य तसेच राजशिष्टाचाराचे संकेत, न्यायव्यवस्था, दंडयोजना, परराष्ट्रसंबंध, परकीय प्रवाशांची निरीक्षणे अशा बाबीदेखील इतिहासलेखनात समाविष्ट असतात. त्यामुळे 'xyz चा इतिहास' हे प्रकरण कायमच स्वतंत्र लेखास पात्र असते. 'महाराष्ट्राचा इतिहास' हा लेखदेखील स्वतंत्र लेख म्हणून ठेवण्यास पात्र आहे असे वाटते.
बाकी, महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्र लेखामध्ये 'इतिहास' प्रकरणातदेखील त्याचा यथायोग्य अंतर्भाव व्हायला हवा.. परंतु वर (वानगीदाखल म्हणून) दिलेल्या मुद्द्यांना महाराष्ट्र या सर्वसमावेशक लेखात पुरेसा न्याय देणे विस्तारभयास्तव अशक्य आहे. त्याकरता हा लेख वापरून त्याचा संदर्भ "अधिक माहितीकरता वाचा: महाराष्ट्राचा इतिहास" असे लिहून द्यावा.
--संकल्प द्रविड 19:58, 2 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत
[संपादन]प्रत्येक राज्याचे पान पाहिल्यास त्यातील जिल्ह्यांविषयीचे लेख वेगळे आहेत व ते लेख प्रत्येक राज्याच्या पानावर भूगोल/जिल्हे यामथळ्याखाली यावरील विस्तृत लेख पहा - (राज्याचे नाव)तील जिल्हे असे उद्धृत केलेले आहेत.
याबाबतीतही तसेच करावे.
अभय नातू 20:06, 2 डिसेंबर 2006 (UTC)
- महाराष्ट्र या पानातील इतिहास विभाग लहान करावा असे आपणास वाटते का?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 06:03, 3 डिसेंबर 2006 (UTC)
ह्या लेखाचा अधिक विस्तार व्हावा
[संपादन]इथे महाराष्ट्राच्या लेखाचे विस्तारीकरण करायला हवे ,लेख अगदीच जूजबी माहिती देतो असे दिसते.त्यावर अधिक विस्तृत माहिती हवी असे वाटते. ह्यासंबंधी असणार्या इंग्रजी लेखाचे मराठीत भाषांतर हवे.बदल अपेक्षीत क.लो.अ.Pra.K. ०७:२२, २४ मार्च २०१० (UTC)
या लेखात चांगले योगदान करीत आहात.तो सुंदर होत आहे.
वि. नरसीकर (चर्चा) ०८:०४, २४ मार्च २०१० (UTC)
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद Pra.K. ०८:१८, २४ मार्च २०१० (UTC)
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन येथे समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) ०८:५०, १४ मार्च २०२२ (IST)
महाराष्ट्राच्या इतिहासाचे वेग वेगळ्या काळानुसार अनेक प्रकार आहेत.
प्रागैतिहासिक काळ (इ. स. पू. सु. १५००००−७००)
[संपादन]महाराष्ट्रात प्रागैतिहासिक काळात किंवा अश्मयुगात, मानवाने वस्ती केली होती, याचा पुरावा १९४० सालापर्यंत उपलब्ध झालेला नव्हता. मानवाने महाराष्ट्रात एकदम ऐतिहासिक काळातच प्रथम वस्ती केली, असेच बहुतेक विद्वानांचे मत होते. अर्थात याआधी अश्मयुगीन पुरावा अजिबात उपलब्ध नव्हता असे मात्र नाही. १८६३ साली गोदावरीकाठी मुंगी पैठण येथे अश्मयुगीन मानवाने बनवलेले ॲगेट दगडाचे ��िलका-हत्यार सापडले. याच प्रदेशामध्ये रानटी हत्तीच्या अश्मास्थी मिळाल्या. त्यानंतर १९०४ साली नासिक जिल्ह्यातील नांदूर-मदमेश्वर याठिकाणी असेच प्राचीन हत्तीचे अवशेष मिळाले.
महाराष्ट्रातील गिरणा, तापी, वैनगंगा, कृष्णा, प्रवरा, घोड, मुळा इ. निरनिराळ्या नद्यांच्या खोऱ्यांत १९३९ सालापासून गेल्या ४५ वर्षांत प्राचीन अश्मयुगीन हत्यारे सापडलेली आहेत. याशिवाय रानटी हत्ती, रानबैल, गेंडा इत्यादींच्या अश्मास्थीही सापडलेल्या असल्याने प्राचीन अश्मयुगीन काळात महाराष्ट्रात मानवाची वस्ती होती, हे सिद्ध झालेले आहे मात्र इतक्या प्राचीन काळातील मानवाचे अवशेष मात्र सापडलेले नाहीत.
गेल्या २५ वर्षांत पुरातत्त्वज्ञांनी केलेल्या समन्वेषणामुळे अश्मयुगाच्या विविध अवस्थांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे सलग जरी नव्हे, तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील मानवाचा सांस्कृतिक इतिहास मांडता आलेला आहे.
अश्मयुगाच्या खालील अवस्था स्पष्ट झालेल्या आहेत
- आद्य वा आदिम पुराणादमयुग−(इ.स.पू. १.५ लाख वर्षांपूर्वी)
- मध्य पुराणाश्मयुग−(इ.स.पू. १ लाख ते ३० हजार वर्षे)
- उत्तर पुराणाश्मयुग−(इ.स.पू. ३० हजार ते १० हजार वर्षे)
- मध्याश्मयुग−(इ.स.पू. १० हजार ते ४ हजार वर्षे)
- ताम्रपाषाणयुग−(इ.स.पू. ४ हजार ते २७०० वर्षे)
आद्य पुराणाश्मयुग
[संपादन]या काळातील ओबडधोबड दगडी हात-कुऱ्हाडी, फरश्या इ. हत्यारे अनेक ठिकाणी सापडली. नेपासे (जि. अहमदनगर) येथे केलेल्या उत्खननात या हत्यारांबरोबर रानबैलांचे जीवाश्म सापडले. ही हत्यारे टॅप जातीच्या दगडाची आहेत. त्याकाळी प्रवरा नदी हल्लीच्या पातळीपेक्षा सु. १० ते २० मी. अधिक उंचीवरून वाहात असावी आणि हवामान आजच्यापेक्षा अधिक शुष्क असावे.
मध्य पुराणाश्मयुग
[संपादन]या काळातील हत्यारे महाराष्ट्रात सर्वत्र सापडली आहेत. ती प्रामुख्याने चर्ट जातीच्या दगडाची आहेत. त्यांत हरतऱ्हेच्या तासण्यांचा अंतर्भाव होतो. या काळात प्रवरा, कृष्णा, गोदावरी इ. नद्यांनी भूकंपीय हालचालींमुळे आपली पात्रे खोल करण्यात सुरुवात केली. त्यामुळे त्या हल्लीपेक्षा १५ ते २० मी. खोल खाली वाहात होत्या. पावसाचे प्रमाण त्या काळात २५ ते ३० टक्क्यांनी अधिक होते. हत्ती, रानबैल, गेंडा इ. अनेक जंगली प्राणी या काळात इतस्ततः वावरत होते. मराठवाड्यात आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काठी या काळातील असंख्य जीवाश्म मिळाले आहेत.
उत्तर पुराणाश्मयुग
[संपादन]या काळात गारांची पात्यावर बनविलेली हत्यारे वापरात होती. रानबैल, हत्ती, पाणघोडा, हरिण, सुसर इ. अनेक प्राणी अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील नद्या उथळ पात्रांतून वाहात होत्या. त्यांची पात्रे हल्लीपेक्षा ५ ते १० मी. अधिक उंचीवर होती. हे बहुधा शुष्क हवामानाने झाले असावे, असा भूशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कोकणपट्टीत समुद्रपातळी आतापेक्षा २० ते ३० मी. खाली गेली आणि त्यामुळे मोठा भूप्रदेश अस्तित्वात आला. पुराणात परशुरामाने सुपाने कोकणातील समुद्र मागे हटवून तेथील भूमी वसाहतीस योग्य केली, अशी कथा आहे. तिचे शास्त्रीय स्पष्टीकरण आता देता येते.
मध्याश्मयुग
[संपादन]या काळातील गारांची पात्यांवर बनवलेली हत्यारे महाराष्ट्रात सगळीकडे सापडतात. इनामगाव (जि. पुणे) आणि पाटण (जि. जळगाव) येथे झालेल्या शास्त्रशुद्ध उत्खननांवरून हे दिसून येते. या काळात हवामानात महत्त्वाचा बदल घडून आला. मॉन्सूनचा पाऊस विपुल पडू लागला. पाऊस वाढल्याने नद्यांचे पात्र खोल गेले आणि सु. ७,००० वर्षांपूर्वीपासून त्या हल्लीच्या पातळीवर वाहू लागल्या. त्यांच्या काठावर आज दिसणारी काळी जमीन तयार झाली.
ताम्रपाषाणयुग
[संपादन]महाराष्ट्रात खऱ्याअर्थाने नवाश्मयुग अवतरलेच नाही, असे पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. मध्याश्मयुगानंतर येथे ताम्रपाषाणयुग सुरू झाले. त्यावेळी शेतीचे ज्ञान असलेल्या आणि तांब्याची व दगडी हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या येथे स्थायिक झाल्या. गुजरातमधून उत्तर ���िंधू संस्कृतीचे लोक येथे इ.स.पू. १८०० च्या सुमारास आले. त्यानंतर इ.स.पू. १६०० मध्ये आलेल्या माळव्यातील शेतकऱ्यांनी तापी, गोदावरी आणि भीमेच्या खोऱ्यांत वस्ती केली. इ.स.पू. १४०० च्या सुमारास ⇨ जोर्वे संस्कृतीचा उगम झाला. या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम जोर्वे (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील उत्खननात १९५० मध्ये लागला. या लोकांनी कोकण आणि विदर्भ सोडून सर्व महाराष्ट्रभर वसाहती स्थापन केल्या. या सर्व वसाहतींतील भौतिक जीवन समान होते फक्त रंगीत खापरे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. महाराष्ट्राचे हे आद्य शेतकरी जव, गहू,मूग, मसूर, कुळीथ इ. पिकांची लागवड करीत आणि गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी इ. प्राणी पाळीत. वन्य प्राण्यांची शिकार आणि मासेमारी यांच्यावरही त्यांची उपजीविका अंशतः अवलंबून असे. त्यांची हत्यारे गारेच्या पात्यापासून बनविलेली असत. तांबे दुर्मिळ असल्याने त्याचा वापर फक्त महत्त्वाची हत्यारे आणि अलंकार करण्यासाठी मर्यादित स्वरुपात करीत.
या ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या सु. दोनशेहून अधिक वसाहती आतापर्यंत उजेडात आल्या आहेत. त्यांपैकी प्रकाशे (जि. धुळे) बहाळ आणि टेकेवाडा (जि. जळगाव), नासिक, नेवासे आणि दायमाबाद (जि. अहमदनगर), चांदोरी, सोनगाव आणि इनामगाव (जि. पुणे) इ. स्थळी उत्खनन झाले आहे. इनामगाव येथील उत्खनन फार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तत्कालीन जीवनाचे अनेक पैलू आता उजेडात आले आहेत. दायमाबाद येथील उत्खननही महत्त्वपूर्ण आहे.
प्राचीन काळ (इ. स. पू. ६००−इ. स. १३१८)
[संपादन]लोहयुगाची सुरूवात महाराष्ट्रात इ. स. पू. ७ वे−८ वे शतक इतकी मागे नेता येते. या लोहयुगात उत्तर भारतामध्ये मोठी क्रांती घडून आली आणि तिची परिणती नंद, मौर्य यांसारख्या मोठमोठ्या साम्राज्यांमध्ये झाली. तिचे पडसाद महाराष्ट्रात फारसे दिसून येत नाहीत. काही विद्वानांच्या मते मराठवाड्यातील नांदेड आणि नंदाचे ‘नवनंदडेहरा’ हे एकच असावे परंतु नंदांचा महाराष्ट्राशी कोणत्या स्वरुपात संबंध आला असावा, याबद्दलचा पुरावा अद्यापि फारसा उपलब्ध झालेला नाही. नंदांच्या नंतर आलेल्या चंद्रगुप्त मौर्यांच्या साम्राज्याचा विस्तार लक्षात घेता महाराष्ट्राशी त्याचा थोडाफार संबंध आला असावा, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही परंतु या संपर्काचे स्वरूप निश्चित कसे होते, हे सांगणे कठीण आहे. मौर्य सम्राट अशोकाचा मात्र महाराष्ट्राशी संबंध होता, हे महाराष्ट्रात सापडलेल्या सोपारा येथील गिरिलेखावरून कळून येते. अशोकाने धर्मप्रसारार्थ धर्मोपदेशक पाठविले. त्यांपैकी अपरांतात (उत्तर कोकण) धर्मरक्षित हा यवन धर्मप्रसारासाठी पाठविला, तर महाराष्ट्रात महाधर्मरक्षित हा धर्मप्रसारक पाठविला. अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा लक्षात घेता, सध्याच्या महाराष्ट्राचा बराचसा भूभाग त्याच्या अंमलाखाली होता.
सातवाहन
[संपादन]मौर्यांनंतर आलेल्या सातवाहनांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सुस्पष्ट होतो. वायु, विष्णु, मत्स्यइ. पुराणांत त्याचप्रमाणे जैन ग्रंथांमध्ये या राजवंशाबद्दल माहिती मिळते. सातवाहन राजे हे मूळचे पैठणचे होते आणि ते ब्राह्मणपिता आणि नागवंशी आई असे संकरोत्पन्न होते.
या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही अनेक मते मांडली गेली आहेत. यांना आंध्र आणि आंध्रभृत्य असेही पुराणांत संबोधलेले आहे. या राजवंशाच्या कालखंडाबद्दल तसेच त्यातील राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत आढळत नाही. मराठवाड्यातील पैठणजवळचा भाग व आंध्र प्रदेश येथे या घराण्यातील सुरूवातीच्या राजांची नाणी सापडली आहेत. या नंतरच्या राजांची नाणी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक अशा विस्तृत प्रदेशांतसापडली. त्यावरून या राजवंशाच्या साम्राज्याची व्याप्ती लक्षात येते. सातवाहन राजघराण्यातील काही राजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीन महत्त्वाचे आहेत.
वाकाटक
[संपादन]वाकाटकांच्या कालखंडाबद्दल विद्वानांत मतैक्य नाही. त्याचा कालखंड सर्वसाधरणपणे इ. स. तिसरे शतक ते पाचवे शतक असा मानण्यात येतो. या घराण्याचे गुप्त सम्राटांशी वैवाहिक संबंध होते आणि त्यांचे राज्य मुख्यतः विदर्भात पसरले होते. यांच्या कारकीर्दीत कला आणि वाङ्मय यांची भरभराट झाली. या घराण्यातील राजा दुसरा प्रवरसेन याचे आतापर्यंत जास्तीत जास्त ताम्रपट उपलब्ध झालेले आहेत. याशिवाय विदर्भातील मांढळ, नागरा इ. ठिकाणच्या उत्खननांमध्ये वाकाटककालीन शिल्पांचे आणि विटांनी बांधलेल्या मंदिरांचे अवशेष उपलब्ध झाले. अजिंठा येथील काही चैत्य आणि विहार याच सुमारास खोदण्यात आले आणि त्यांमध्ये चित्रकाम करण्यात आले.
अजिंठ्याच्या १६ क्रमांकाच्या लेण्यातील उत्कीर्ण लेखावरून विंध्यशक्ती राजा आणि या घराण्याची काही माहिती ज्ञात झाली. त्याच्यानंतर आलेल्या पहिला प्रवरसेन या त्याच्या मुलाने वाकाटक घराण्याचा आणि साम्राज्याचा पाया स्थिर केला. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर विभागांवर वर्चस्व स्थापिले. पुढे त्याने नर्मदेपर्यंत वचक बसवून माळवा आणि सौराष्ट्र येथील शक-क्षत्रपांवर आपली हुकमत गाजविली. प्रवरसेनाचा मुख्यमंत्री हरिषेण याचा उल्लेख अजिंठा येथील घटोत्कच लेण्यातील लेखात आलेला आहे.