चर्चा:पुणे
कुलूप काढा, नाहीतर...
[संपादन]पुण्याच्या या पानाला संपादनाचं कुलूप लावलेलं आहे. आपल्या (इथल्या तरी) पेठा जाणिवपूवर्क जपण्याचाच हा प्रयत्न आहे. हे विकिपीडियाच्या मूळ तत्वांविरोधात नाही काय? पुंडावा (vandalism) मोडून काढण्याचे इतर अनेक मार्ग विकिपीडियावर आहेत. त्याचा वापर करावा पण हे संपादनावर लागलेले कुलूप काढावे. उगाचच सुप्रीम कोर्टापर्यंत भांडणे नेण्याची (पहा ः पुलंकृत असा मी असामी) मराठी परंपरा पाळावी लागू नये अशीच इच्छा आहे. मनोज १७:१३, २ जुलै २००८ (UTC)
- Dear Manoj,
- This article, like most (99.999%) articles on Marathi wikipedia, is NOT locked to everyone-but-sysops. It is only locked to anonymous users. As Sankalp had already explained to you on Nagpur talk page, we keep all our featured pages locked to anonymous users. It is to maintain richness of these articles. All other articles, including future feature articles, are open to editing by all, including anonymous users.
- To edit this article, simply log into Marathi wikipedia and start editing. Be prepared to answer questions about vague/unreferenced/POV'ed edits.
- If you have a problem with this policy, you're welcome to discuss it on चावडी.
- I do not understand your adversarial language and attitude, especially when you do not have all the facts right.
- अभय नातू १८:५०, २ जुलै २००८ (UTC)
- मनोज, तुम्हाला लेख संपादता येत नाही म्हणजे नक्की काय अडचण येते/ एरर येते ते सांगा की! वर्णन करून नक्की काय घोळ होतोय हे कळवले तर प्रबंधक/इतर सदस्य तुम्हाला मदत करू शकतील. स्वतः सविस्तर काही न सांगता गैरसमज करून घेऊन, राग डोक्यात घालून घेऊन न्यायालयापर्यंत धाव घेण्यात काहीएक अर्थ नाही. :)
- अभय म्हणतात त्याप्रमाणे या लेखाचे संपादन केवळ अनामिक सदस्यांना निषिद्ध आहे. तुम्हाला अडचण येत आहे त्याचे कारण तांत्रिक असू शकेल.. पण त्याकरता तुम्हालाच पुढाकार घेऊन सविस्तर वर्णन लिहून मदत मागता येईल.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०२:२४, ३ जुलै २००८ (UTC)
नमस्कार संकल्प,:) मी माझ्या या नावाने प्रवेश करूनही (लॉग ईन) पुणे आणि नागपूरच्या लेख पानाला संपादन हे टॅब दिसत नाही, जे त्याचवेळी नाशिक औरंगाबाद किंवा इतर अनेक पानांना दिसतय. त्यामुळे मला त्यातलं कंटेंट (आता ह्याला नेमका मराठी शब्द काय बोवा) बदलता येत नाही.
राग डोक्यात घालूनचा (मी समजतो त्यानुसार) विनोद आवडला. :) आपण सगळेच स्वयंसेवा पद्धतीने इथे काम करतो नाही का. ज्याला राग येत असेल त्यानं निघून जावं. न्यायालयाचा उल्लेख प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या असा मी असा मी या एकपात्री प्रयोगातल्या एका पात्राच्या तोंडचा आहे, ज्यात भाऊबंदकीची भांडणं मराठी माणंस वरच्या न्यायालयांपर्यंत नेतात याचा गमतीदार उल्लेख आहे.:)
मला इंग्रजी विकिपिडीयाच्या कुठल्याही बोल पानावर (टॉक पेजवर) मराठीत लिखाण दिसत नाही. मग इथे इंग्रजी का. मराठी विकीपिडीयावर राहूनही इंग्रजीतून लिहीण्यात आनंद मानणारे इथे काय म्हणत आहेत हे, येथे मराठी विकीपिडियावर तरी, समजूनही घ्यायची माझी इच्छा नाही. त्यांना मला काही लिहायचं असेल तर त्यांनी ते इथे तरी मराठीतच (होय, च आवश्यक आहे) लिहीलं पाहिजे तर काही मी उत्तर देऊ शकेन. इथेही मराठीत लिहीता येत नसेल तर मराठी विकीपिडीयावर येण्याचा उपद्व्याप करता कशाला. या पिलावळीने इंग्रजी विकीपिडीयावर जाऊन आपले इंग्रजीप्रेम त्याच भाषेत व्यक्त करावे हे उत्तम.
जर पुढे मी वाद वाढवलाच, तर आपण काय लिहीले हे विकीपिडीयाच्या अमराठी धुरीणांना कळावे म्हणून त्या भाषेत लिहावे हा त्यांचा यामागचा धोरणीपणा असेल, तर त्याला मात्र मी मनापासून दाद देतो. :)
असो, वरील पानाना संपादन टॅब दिसू देण्याची किंवा दिसू न देण्याची युक्ती मराठी विकीपीडीयाच्या पदाधिकारी मंडळींच्या हाती आहे (असं मी समजतो), तर ती त्यांनी फिरवून संपादनाचे अधिकार म्या पामरालाही मिळू द्यावेत ही विनंती.मनोज १७:५८, ३ जुलै २००८ (UTC)
- Sounds like it's gang-up-on-Abhay Day...heh.
- Manoj, the reason for me writing in English is that I do not have access to Marathi keyboard for a period of time. (Now therein lies another burning topic, but more on that later.) If you look at my 43,000+ edits, you will find that majority of those are in Marahi!!
- Anyway, as for the trouble you're having editing while logged-in, a while ago, Kaustubh (another sysop) had found that wikimedia software treats newly registered members as anonymous for a period of time (I believe it was 10 days or close to it), so hopefully, you will pass that soon and will be able to anonymous-blcoked articles as well.
- इथेही मराठीत लिहीता येत नसेल तर मराठी विकीपिडीयावर येण्याचा उपद्व्याप करता कशाला. या पिलावळीने इंग्रजी विकीपिडीयावर जाऊन आपले इंग्रजीप्रेम त्याच भाषेत व्यक्त करावे हे उत्तम......विकीपिडीयाच्या अमराठी धुरीणांना कळावे... :-) I really do not get the animosity that has suddenly cropped up against me..lol...oh well...
- अभय नातू १८:०८, ३ जुलै २००८ (UTC)
मला इंग्रजी विकिपिडीयाच्या कुठल्याही बोल पानावर (टॉक पेजवर) मराठीत लिखाण दिसत नाही. मग इथे इंग्रजी का. मराठी विकीपिडीयावर राहूनही इंग्रजीतून लिहीण्यात आनंद मानणारे इथे काय म्हणत आहेत हे, येथे मराठी विकीपिडियावर तरी, समजूनही घ्यायची माझी इच्छा नाही. मनोज,
तुमच्या या खोचक वाक्यामुळे खास वेगळा संगणक शोधून काढून उत्तर लिहित आहे. इंग्लिशमध्ये लिहिल्याने मी लिहिलेले खोटे होते का? आणि तुमच्याही लिहिण्यात अनेक इंग्लिश शब्द वापरलेतच की तुम्ही ��ाव?! आं?
असो, तुमचे सदस्यत्व नवीन असल्यामुळे तुम्हाला कदाचित पुणे, नागपूर, इ. सुरक्षित पाने संपादित करता येत नाहीत असा माझा कयास आहे. कौस्तुभने माहिती काढल्याप्रमाणे १० दिवसांत ही अडचण दूर होइल असे मला वाटते.
अधिक मदत लागल्यास नि:संकोच मागावी. मला शक्य असल्यास करेन, नसल्यास काय करावे हे तरी सांगेन.
अभय नातू १८:१७, ३ जुलै २००८ (UTC)
हां अश्शी. तर लोकहो, माझं तथाकथित खोचक लिखाण वाचल्यापासून- मराठी कळफलक मिळवून- मराठीतलाच संदेश चिकटवीपर्यंत त्यांच्या मनाची जी अवस्था होती, ती अभयरावांना लिहायला सांगा. आणि मराठी भाषा दिसेल तिथे मनात हीच अस्वस्थ अवस्था दिवसाचे चोवीस तास राहू द्या, बस्स. मराठीसाठी आणखी मनसे वेगळं काही करण्याची गरजच उरणार नाही, पाहा.
अभयराव, हाताशी मराठी कळफलक नसेल तरी इथे नका इंग्लिश लिहू, तुमच्या काही मिनीटे- तास- दिवस- आठवडे काहीही न लिहीण्यानं, मराठी विकीपिडीयावर काय आभाळ कोसळत नाही. मुद्दा खरं - खोटं हा नाही. मुद्दा भाषेचा आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या भाषेतले शब्द वापरणं आणि तीच भाषा वापरणं यात खूप फरक आहे, हे आपण जाणतच असाल. शिवाय हाच निकष लावायचा म्हटला तर मराठी भाषाच उरणार नाही. कारण मराठीचे असे स्वतःचे शब्द दोन-पाच टक्केही नाहीत. सगळे शब्द मूळ (किंवा भ्रष्ट) स्वरूपातले फार्सी, हिंदी, संस्कृत, कन्नड, गुजराती (आणि आता इंग्लिश) आहेत. असो. आपण मूळ मुद्द्यावर जी अमूल्य माहिती पुरवलीत त्याबद्दल धन्यवाद. मी दहा दिवस वाट पाहू शकतो.
इथले तथाकथित खोचक लिखाण मी जतन करून ठेवतो आहे, मराठी विकीपिडीयावर ते याही पुढे इंग्रजी दिसले की वापरण्याचा विचार आहे. ः) मनोज १९:१८, ३ जुलै २००८ (UTC)
- वापरलेत तर भले, पण सगळ्यांक्डून सभ्य भाषेत उत्तर मिळण्याची आशा ठेवू नका.
- बाहेरील जगाप्रमाणे येथेही उर्मटोत्तम मधून मधून उपस्थित होतातच :-)
- अभय नातू १९:२७, ३ जुलै २००८ (UTC)
अहो, खरंतर सभ्य भाषेत लिहीणे कसे काय बोवा जमते, याचेच माझे मला आश्चर्य वाटते हाहाहा. - मनोज १९:४६, ३ जुलै २००८ (UTC)
- हे वाचून खुदकन् हसलो!(ज्याला विंग्रजीत लॉल म्हणतात ते) आजचा दिवस अभय नातुंचा आहे यात शंका नाही. -- कोल्हापुरी ०९:३४, ४ जुलै २००८ (UTC)
प्रिय मनोज,
नवीन सदस्यांना "नोदणीकृत सदस्यांचे" अधिकार मिळण्याचा कालावधी ४ (चार)च दिवसांचा आहे. त्यानंतर या सर्व लेखांमध्ये बदल करता येतील. तुम्ही दि. ३०.०६.२००८ नोंदणी केलेली आहे त्यामुळे आता तुमच्या पसंतीमध्ये तुम्हाला "सदस्य गट अधिकार" इथे नोंदणीकृत सदस्य असे दिसत असेल.
क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:०४, ४ जुलै २००८ (UTC)
SamasamikSha(Peer Review)
[संपादन]- This Marathi Language article is about Maharashtra's Second largest Pune City in Western India.Mahitgar १३:१४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
- This article is in Marathi language, non Marathi people are less likely to visit this page,While Map given here is taken from en Wikipedia , In my personal openion either a city map or a loction in Maharashtra suits better.
- This article gives information on industrial aspects of sister city Pimpari-Chinchawad.I wish Marathi Wikipedians have a little more policy discussion what and how much info to be included about sister cities in respective pages.
- Please do check word कङनाटक if it is correctly written.कङनाटक संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.
- in section धर्म- अध्यात्म mention of 'Parvati' is missing.
- in section खव्वयेगिरी I did not find mention of 'amruttulya',Vadapaav,SPDP and Misal are missing!
- Statement परंतु बीएसएनएल, टाटा व रिलायंस या कंपन्या आघाडीवर आहेत. needs to be supported with ref of authentic source.
- When there are no. of deemed universities how far पुण्यातील सर्व महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. this sentence is correct ?
- Please some one re confirm exactly which subjects in सिंबायोसीस form part of सिंबायोसीस deemed university Whether (व्यवस्थापन व कायदा शिक्षण) this detail is correct.
- I am not used to reading word नॅश्नल this way is it correct नॅश्नल सेंटर फॉर रेडियो ऍस्ट्रोफिजीक्स सेंटर फॉर रेडियो ऍस्ट्रोफिजीक्स
- Sections इतिहास and संस्कृती has further scope for expansion and rewriting.
- Pune history has its own large share in for support and opposition to various social reform movements , and femenist(?) movements, this article does not take in to account these aspects of pune.
- Article does not take in to account problems of Air Pollution and Water pollution etc.
Mahitgar १३:४५, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
- नमस्कार माहितगार विकिसुट्टी पासून परत आल्याबद्दल धन्यवाद. हा लेख इंग्रजी विकिपीडियावरील इंग्रजी लेखाचे भाषांतर आहे. महाराष्ट्राच्या नकाशात पुण्याचे स्थान दाखविणे मलाही रास्त वाटते. कोणी कृपया svg हा काय प्रकार असतो (नकाशांत विशिष्ट जागा कशा दाखवाव्यात) हे सांगावे.
- पिंपरी-चिंचवडची माहिती येथे असणे गरजेचे आहे.तसेच मुंबई-नवी मुंबई-ठाणे-कल्याण-मीरा भाईंदर या शहरांतील interdependence पेक्षा पुणे-पिंपरी-चिंचवड अधिक आहे. आमची माहिती येथे हवीच! :)
- पुण्यातील सर्व महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. this sentence is correct ? हे विधान बरोबरच आहे.
- बीएसएनएल, टाटा व रिलायंस या कंपन्या आघाडीवर आहेत. माझ्यामते कमीत कमी बीएसएनएल बाबत विधान योग्य आहे.
- खवय्येगिरी बाबत आप्ण लिहिलत तर बरं होईल कारण मला जास्त माहित नाही.
- बाकीची minor चुका मी correct करीत आहे.
- peer review बद्दल धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १६:०६, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
colleges in Pune
[संपादन]Bharati Vidyapith is a deemed university and gives out degrees bearing its own name to graduating students. BVP has two major campuses in Pune and colleges affiliated to BVP are not affiliated to University of Pune.
अभय नातू २०:२६, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
- अभयची माहिती बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यात पुणे विद्यापिठाखेरीज भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ ही विद्यापीठे आहेत. त्याव्यतिरिक्तदेखील काही विद्यापीठे असू शकतील. त्यामुळे 'बहुसंख्य महाविद्यालये पुणे विद्यापिठाशी संलग्न आहेत' हे विधान बरोबर ठरू शकेल.
- --संकल्प द्रविड ०५:२३, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- लेखात अनेक लाल रंगाच्या लिंक्स दिसत आहेत. कृपया त्यांचे लिंकिंग काढावे कारण लेख अपूर्ण वाटतो. संपादन करताना केवळ ज्यांचे लिंक्स आहेत (किंवा असू शकतात) त्यांचेच लिंकिग करीत असतो.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०६:४९, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
लिंक्स काढण्यापेक्षा हे लेख तयार करावे. पाच ओळींचा जरी लेख असला तरी तो सदर लेखाच्या संदर्भात उपयुक्त ठरतो. शिवाय, एखादा लेख मुखपृष्ठ सदर करण्यामागे त्या विषयावरील (शक्यतो) सर्वंकष माहिती विकिपीडियावर उपलब्ध व्हावी हाही आहे!
अभय नातू १६:३१, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
ग्रामदेवता
[संपादन]देवी चतु:श्रृंगी ही पुण्याची कुलदैवत आहे.
ही माहिती बरोबर आहे का? मला वाटते पुण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी आहे. तसेच, कुलदेवत कुटुंब/कुळाला असते. गावाला नव्हे.
अभय नातू २३:५२, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- काहीच कल्पना नाही. कसबा गणपती, जोगेश्वरी व चतु:श्रृंगी ही तीन नावे पुढे आली आहेत. इंग्रजी विकित जोगेश्वरीचा उल्लेख नाही. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०६:५०, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
पुण्यामध्ये जोगेश्वरी देवीचे मंदीर हे पेशव्यांच्या काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्दीस आले.कसबा गणपती मंदिराचा जीर्णोध्दार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात करण्यात आला व ते त्या काळच्या पुनवडीचे ग्रामदेवत म्हणून नावारुपाला आले.धनंजय बाजीराव कडू.
*"पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये दरवर्षी १०,००० इंजिनियर्सना पदवी प्रदान करतात." I always belived '१०,००० इंजिनियर्सना' is a figure that represents entire Maharashtra.May be above sentence is correct but can some one cite source of this info please.
Mahitgar ०६:३१, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- मला हा आकडा जास्त वाटत नाही. पण शंका असेल तर exact आकडा लिहू नये. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:२३, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
117.223.58.145 १४:१६, १६ जानेवारी २०१५ (IST)priyanka
खव्वयेगिरी की खवय्येगिरी?
[संपादन]मला खवय्येगिरी हा शब्द बरोबर वाटतो. ---- कोल्हापुरी १०:०२, १२ मार्च २००७ (UTC)
- बरोबर; 'खवय्येगिरी' असा शब्द आहे. मी लेखात तसे बदल केले आहेत. --संकल्प द्रविड १०:०९, १२ मार्च २००७ (UTC)
आघारकर की आगरकर?
[संपादन]मला आगरकर हा शब्द बरोबर वाटतो. ---- --छू १६:२४, २५ मार्च २००७ (UTC)
- त्या संस्थेचे नाव 'आघारकर' असे आहे. बर्याच जणांना 'आगरकर' हे आडनाव ऐकून माहीत असल्यामुळे या संस्थेचे 'आघारकर' हे नाव typo असल्यासारखे वाटते. पण ते तसे नाही.. इथे संस्थेच्या संकेतस्थळावर देवनागरीतील नाव वाचा: आघारकर संशोधन संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ
- --संकल्प द्रविड ०४:३५, २६ मार्च २००७ (UTC)
translation
[संपादन]I would be working to translate this article in Hindi. See: hi:पुणे
- --Mitul0520 ०५:४६, १४ मार्च २००७ (UTC)
Osho International Meditation Resort
[संपादन]Note that the following WikiCommons picture is available for inclusion in the article, if needed:
Need change in article pattern
[संपादन]- 1. At many paragraphs authors has contributed giving their opinion rather factual information. Phrases like "पूर्वेचे ऑक्सफोर्ड" "भारताचे 'डेट्रॉईट'" " विद्येचे माहेरघर" etc are popular phrases, i feel, shall not be used in article; however I do believe in these phrases; they shall be put at the end of the paragraph with preamble, "why so? or म्हणुन".
- 2. Article seriously lacks references and many figures do not really reflect factual information. For example, उन्हाळा- "मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो" and "पावसाळ्यात तापमान २०°-२८° से. इतके असते."
- 3. Article talk lot about IT industry but not general information in related section. Not against, but should be balanced.
- 4. Lots of room to add images or photographs, which indirectly acts as reference.
- I am working on this article currently and will add available information from my side. Notes above has been added to highlight few discrepancies and not to criticize.
- Thanks, अमित य़ादव ०७:०९, २ ऑगस्ट २०१० (UTC)
बेढब
[संपादन]- अमितच्या वरील प्रतिक्रीयेशी सहमत.पुणे विषयक लेखात माहिती वाढत असतानाच बेढबपणा येत चाललेला आहे.स्वातंत्र्ययुद्धातील तसेच प्रबोधन चळवळीतील पुण्याचा आणि पुणेकरांचा परोक्षापरोक्ष सहभाग आहे हे निश्चित पण ती माहिती स्वतंत्र लेख होऊ शकेल इतपत मोठी आहे ती सर्व माहिती स्वतंत्र लेखात हलवून केवळ संक्षीप्त परिच्छेद या लेखात समाविष्ट करावयास हवेत.माहितगार १५:३४, २८ एप्रिल २०११ (UTC)
पुन्हा एकदा बेढब पणा
[संपादन]पुणे विषयक लेखात माहिती वाढत असतानाच पुन्हा एकदा बेढबपणा येत चाललेला आहे. पेठा आणि इतर महिती वेगळ्या लेखात लिहून मुख्य लेखात जोग दिला तर जास्त चांगले वाटेल..... मंदार कुलकर्णी