अर्जुनी मोरगाव
Appearance
?अर्जुनी मोरगाव अर्जुनी महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: तांदुळ नगरी | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | नागपुर |
मोठे मेट्रो | नागपुर |
जवळचे शहर | गोंदिया |
प्रांत | विदर्भ |
विभाग | नागपुर |
जिल्हा | गोंदिया |
लोकसंख्या | १६,००० (२०२२) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ |
उपविभाग | अर्जुनी मोरगाव |
पंचायत समिती | अर्जुनी मोरगाव |
तहसील | अर्जुनी मोरगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४१७०१ • +०७१९६ • MH-३५ |
अर्जुनी मोरगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक शहर व तसेच येथे नगर परिषद अर्जुनी व तसेच एक उपविभाग आहे. अर्जुनी मोरगाव उपविभागमध्ये दोन तालुके असून प्रसिद्ध नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व इटियाडोह धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोबतच प्रतापगड किल्ला, तिबेट कॅंम्प, चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिर गोंदिया-चंद्रपूर-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गावर घनदाट जंगलामध्ये वसले असून दर मंगळवार व शनिवारला भक्तांची वारी असते. येथुन प्रमुख राज्य महामार्ग ११ (महाराष्ट्र) गेलेला आहे.
जाण्यासाठी मार्ग
[संपादन]- १.गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर या महाराष्ट्रातील प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आणि राज्य महामार्ग क्रमांक-275 वर आहे.
- २.अर्जुनी मोरगाव-लाखांदुर-पवनी राज्य महामार्ग क्रमांक-354 वर आहे.
- ३.अर्जुनी मोरगाव-सानगडी-साकोली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-36 वर आणि राज्य महामार्ग क्रमांक-366 वर आहे.
संस्कृती
[संपादन]अर्जुनीचा राजा हा महाराष्ट्रातील अर्जुनी मोरगावमधील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती शहरातील अतिशय जोमाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणारा महत्वपूर्ण उत्सव आहे.
हा १० दिवसीय गणेशोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो.