अजित प्रसाद जैन
अजित प्रसाद जैन (ऑक्टोबर, १९०२ - २ जानेवारी, १९७७) एक भारतीय राजकारणी होते. हे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, संविधान सभेचे सदस्य, केंद्रीय मंत्री आणि केरळचे राज्यपाल होते.[१][२]
पूर���वजीवन
[संपादन]जैन यांचा जन्म मेरठ येथे १९०२ मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते चंदौसी येथील एसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.[३] लखनौ विद्यापीठात त्यांनी ऑनर्ससह पदवी संपादन केली आणि एल.एल.बी. पण केले. १९२६ मध्ये त्यांनी आपली वकिली सुरू केली. त्यानंतर लवकरच ते राजकारणाकडे आकर्षित झाले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.
राजकीय कारकीर्द
[संपादन]जैन यांनी नागरी अवज्ञा आंदोलन (१९३०) आणि नंतरच्या सर्व काँग्रेस चळवळींमध्ये भाग घेतला. ते लवकरच यू.पी. मध्ये प्रख्यात झाले व युपी काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी झाले. ते संयुक्त प्रांतातून मतदार संघात निवडून गेले व त्यांची यू.पी. मध्ये संसदीय सचिव म्हणून १९३७ मध्ये नेमणूक झाली त्यांनी १९३९ मध्ये राजीनामा होईपर्यंत दिला. ते दीर्घकाळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेच्या स्थापनेनंतर नेहरूंच्या नेतृत्वात पुनर्वसन मंत्रालयाचे प्रभारी मंत्री होते. त्यानंतर त्यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात डिसेंबर १९५४ ते ऑगस्ट १९५९ या काळात केंद्रीय अन्न व कृषिमंत्रालय सांभाळले. तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांच्याशी वैचारिक मतभेदांमुळे रफी अहमद किदवई यांनी अखिल भारतीय किसान मजदूर प्रजा पार्टी स्थापन केली. किडवई यांच्याशी एकमत म्हणून जैन यांनी नेहरूंना आपला राजीनामा दिला जो नेहरूंनी मात्र नाकारला.[४]
एप्रिल १९६५ ते फेब्रुवारी १९६६ दरम्यान ते केरळचे तिसरे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. याच काळात केरळ मध्ये राष्ट्रपती राजवट पण होती.[५] लाल बहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनानंतर पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. नंतर ते १९६७ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आणि १९७५ पर्यंत ते सदस्य राहिले.
लेखक
[संपादन]जैन यांनी काही पुस्तक पण लिहिली. १९७१ मध्ये शॉडो ऑफ द बेर: द इन्डो-सोव्हीएट ट्रीटी (Shadow of the Bear: The Indo-Soviet Treaty), १९७२ मध्ये कश्मीर: व्हाट रियली हैपेन्ड (Kashmir: What Really Happened), १९७२ मध्ये इंडिया अँड द वर्ल्ड (India and the World) अशे पुस्तक प्रकाशित झाले. १९६५ मध्ये त्यांनी रफी अहमद किदवईंवर यांचे जीवन चरित्र लिहीले.
मृत्यू
[संपादन]जैन यांचे वयाच्या ७५व्या वर्षी २ जानेवारी १९७७ रोजी निधन झाले.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ Progressive Jains of India Satish Kumar Jain ,Shraman Sahitya Sansthan, 1975 -
- ^ "LIST OF MEMBERS OF THE CONSTITUENT ASSEMBLY".
- ^ "SM College Alumni". 27 सप्टेंबर 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 जुलै 2012 रोजी पाहिले.
- ^ Remembering Our Leaders: Bipin Chandra Pal by Anita Mahajan
- ^ "KERALA LEGISLATIVE ASSEMBLY". 9 एप्रिल 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 डिसेंबर 2008 रोजी पाहिले.
- ^ Data India Press Institute of India, 1977, Page 32