जानेवारी १५
Appearance
<< | जानेवारी २०२५ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५ वा किंवा लीप वर्षात १५ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५५९ - पहिल्या एलिझाबेथचा वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक.
सतरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६१ - एलायशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले.
- १८८९ - द कोका कोला कंपनीची द पेंबरटन मेडिसिन नावानी अटलांटा येथे स्थापना झाली.
विसावे शतक
[संपादन]- १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
- १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फील्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.
- १९७० - मुअम्मर गडाफीने लिब्यासत्ता बळकावली.
- १९७३ - जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर भारताचे ९वे लष्करप्रमुख झाले. बेवूर हे पहिले महाराष्ट्रीय लष्करप्रमुख होत.
- १९७५ - अँगोलाला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९९६ - बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे पुनर्नामकरण करण्यात आले.
- १९९९ - ज्योत्स्ना भोळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - विकिपीडियाचे न्यूपीडिया नावाने प्रकाशन.
- २००५ - युरोपीय अंतरिक्ष संस्थेच्या स्मार्ट-१ या चंद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर कॅल्शियम, सिलिका, लोह, आणि अन्य मूलद्रव्ये असल्याचा शोध लावला.
- २००९ - उड्डाण करताना पक्ष्यांच्या थव्यातील पक्षी दोन्ही इंजिनांमध्ये घुसल्याने इंजिने निकामी झालेले युएस एरवेझचे विमान एकही प्रवासी न गमावता हडसन नदीवर उतरले.
जन्म
[संपादन]- १४१२ - जोन ऑफ आर्क.
- १४३२ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १४८१ - अशिकागा योशिझुमी, जपानी शोगन.
- १७७९ - रॉबर्ट ग्रँट, मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्या नावाने ओळखला जातो.
- १८५६ - विल्यम स्कॉटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६३ - विल्हेम मार्क्स, जर्मनीचा चान्सेलर.
- १८९७ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
- १९०८ - एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.
- १९०९ - ज्याँ बुगाटी, जर्मन अभियंता.
- १९२० - डॉ. आर.सी. हिरेमठ, कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
- १९२१ - बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री.
- १९२६ - खाशाबा दादासाहेब् जाधव , भारतीय कुस्तीगीर.– १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
- १९२९ - डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
- १९१८ - गमाल अब्देल नासर, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी लेखक
- १९४७ - नीतिश नंदी, भारतीय पत्रकार.
- १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.
- १९५६ - पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - बोरिस ताडिक, सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - रिचर्ड ब्लेकी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - ग्रेग लव्हरिज, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - नील नितीन मुकेश, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ६९ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- १५९५ - मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.
- १९९४ - हरिलाल उपाध्याय, गुजराती लेखक, कवी व ज्योतिषी.
- १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.– भारताचे दुसरे पंतप्रधान
- २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.
- २००६ - जबर अल-अहमद अल-जबर अल-साबा, कुवैतचा अमीर.
- २०१३ - डॉ. शरदचंद्र गोखले, मराठी समाजसेवक.
- २०१४ - नामदेव लक्ष्मण ढसाळ, मराठी दलित साहित्यिक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जॉन चिलेम्ब्वे दिन - मलावी.
- कोरियन लिपी दिन - उत्तर कोरिया.
- भारतीय सशस्त्र सेना दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)