जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ (इंग्लिश: Gerald Rudolph Ford, Jr., जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर) (जुलै १४, इ.स. १९१३ - डिसेंबर २६, इ.स. २००६) हा अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान रिचर्ड निक्सन याच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यू याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. वॉटरगेट प्रकरणामुळे ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी रिचर्ड निक्सन याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.

जेराल्ड फोर्ड

कार्यकाळ
९ ऑगस्ट १९७४ – २० जानेवारी १९७७
उपराष्ट्रपती नेल्सन रॉकेफेलर
मागील रिचर्ड निक्सन
पुढील जिमी कार्टर

जन्म ७ फेब्रुवारी, १९१३ (1913-14-07)
ओमाहा, नेब्रास्का
मृत्यु २६ डिसेंबर, २००६ (वय ९२)
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी बेट्टी फोर्ड
गुरुकुल मिशिगन विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन
सही जेराल्ड फोर्डयांची सही

उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात अमेरिकी प्रतिनिधिगृहात मिशिगन संस्थानाचा प्रतिनिधी होता.

अध्यक्ष बनल्यावर त्याने रिचर्ड निक्सन याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. शीतयुद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या हेलसिंकी जाहीरनाम्यावर त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार जिमी कार्टर याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "जेराल्ड फोर्ड: अ रिसोर्स गाइड (जेराल्ड फोर्ड: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
मागील:
स्पिरो ॲग्न्यू
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
६ डिसेंबर, १९७३ – ९ ऑगस्ट, १९७४
पुढील:
नेल्सन रॉकफेलर