जून ७
दिनांक
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५८ वा किंवा लीप वर्षात १५९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०९९ - पहिली क्रुसेड - जेरुसलेमचा वेढा सुरू.
पंधरावे शतक
संपादन- १४९४ - तोर्देसियासचा तह - स्पेन व पोर्तुगालने नव्या जगाची आपसात वाटणी करून घेतली.
सतरावे शतक
संपादन- १६९२ - वेस्ट ईंडीझमधील पोर्ट रॉयल, जमैका येथे तीव्र भूकंप. अवघ्या ३ मिनिटांत १,६०० ठार, ३,००० जखमी.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३२ - कॅनडात आलेल्या आयरिश नागरिकांच्या द्वारे कॉलेराचा प्रादुर्भाव सुरू झाला. ६,००० मृत्यूमुखी.
- १८६२ - अमेरिका व युनायटेड किंग्डमने गुलामांच्या व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.
- १८६३ - फ्रेंच सैन्याने मेक्सिको सिटी जिंकले.
- १८६६ - आयरिश वंशाच्या १,८०० लुटारूंनी कॅनडात धुमाकुळ घातला. यानंतर केनेडियन सैन्याने त्यांना परत अमेरिकेत पळवून लावले.
विसावे शतक
संपादन- १९०५ - नॉर्वेने स्वीडनशी असलेला संघराज्याचा करार विसर्जित केला.
- १९१७ - पहिले महायुद्ध - मेसेन येथे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पेरलेल्या सुरूंगांच्या स्फोटात १०,००० जर्मन सैनिक मृत्यूमुखी.
- १९३८ - डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
- १९४० - नॉर्वेचा राजा हाकोन सातव्याने देशातून पळ काढला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानचे सैनिक एल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु व किस्का बेटांवर उतरले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - नॉर्मंडीत जर्मन सैन्याने कॅनडाच्या २३ युद्धबंद्यांना ठार मारले.
- १९४५ - नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.
- १९४८ - चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.
- १९६५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
- १९८१ - इस्रायेलने इराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.
- १९८९ - सुरिनामची राजधानी पारामारिबो येथे डी.सी.८ प्रकारचे विमान कोसळले. १६८ ठार.
- १९९१ - फिलिपाईन्समधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
- २००४ - शिरोमणी अकाली दल (लॉॅंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
जन्म
संपादन- १७६१ - जॉन रेनी, स्कॉटिश अभियंता.
- १८३७ - अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- १९२८ - जेम्स आयव्हरी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९२९ - जॉन टर्नर, कॅनडाचा सतरावा पंतप्रधान.
- १९४५ - वुल्फगॅंग श्युसेल, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९५७ - नील रॅडफोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - प्रिन्स, अमेरिकन संगीतकार.
- १९६४ - ग्रेम लॅबरूय, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - महेश भूपती, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९८१ - ऍना कुर्निकोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
- १९८१ - अमृता राव, मराठी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १३२९ - रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
- १३५८ - अशिकागा तकाउजी, जपानी शोगन.
- १८२१ - ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु, रोमेनियाचा क्रांतीकारी.
- १८४० - फ्रेडेरिक विल्यम तिसरा, प्रशियाचा राजा.
- १९५४ - ऍलन ट्युरिंग ब्रिटिश गणितज्ञ व स��गणकशास्त्रज्ञ.
- १९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
- १९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
- २००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)