हिवरा धरण
Appearance
हिवरा मध्यम प्रकल्प | |
अधिकृत नाव | हिवरा धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, पाणीपुरवठा |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
हिवरा |
स्थान | गाव: खडकदेवळा, तालुका: पाचोरा, जिल्हा: जळगाव |
लांबी | ३,८६० मी (१२,६६० फूट) |
उंची | १५.२१ मी (४९.९ फूट) |
बांधकाम सुरू | १९७७ |
बांधकाम खर्च | १६.९८ करोड |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | १२.७७ मिलियन क्यूब मीटर |
जलसंधारण क्षेत्र | ४२०४ हेक्टर |
भौगोलिक माहिती | |
निर्देशांक | 20°35′N 75°21′E / 20.59°N 75.35°E |
व्यवस्थापन | महाराष्ट्र शासन |
हिवरा मध्यम प्रकल्प हे जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीवरील खडकदेवळा या गावाजवळ बांधण्यात आलेले आहे. पाचोरा तालुक्यातील जवळजवळ ४२०४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
सिंचन
[संपादन]हिवरा धरणाला डावा आणि उजवा असे दोन कॅनॉल आहेत. दोघं कॅनॉल मधून रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडून ४२०४ हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. हिवरा धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी कॅनॉलद्वारे दरवर्षी पाण्याचा मोठा विसर्ग पाचोरा तालुक्यात होत असतो.
पाणी पुरवठा
[संपादन]तारखेडा, जारगाव या शेजारील गावांना हिवरा धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. संबंधित गावांनी हिवरा धरणामागे सरकारच्या परवानगी���े विहीर खोदून पाणी गावांपर्यंत नेले आहे.