Jump to content

सुप्रिया कर्णिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुप्रिया कर्णिक
जन्म

१३ मार्च, १९७५ ( 1975-03-13) (���य: ४९)

[]
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९२ ते आजतागायत
भाषा मराठी
धर्म हिंदू

सुप्रिया कर्णिक ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील चरित्र कलाकार आहेत. कर्णिक विशेष करून आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. सुपरहिट हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी', 'वेलकम' तसेच 'वेलकम बॅक' मधील विनोदी भूमिकांमध्ये पण त्या गाजल्या आहेत.[][][]

इ.स. १९९६ साली 'तिसरा डोळा' या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत कर्णिक यांनी मराठी अभिनेते रमेश भाटकर सोबत काम केले होते. त्यावेळेस ही मालिका दूरदर्शन या वाहिनीवर प्रसारित झाली होती.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

सुप्रिया कर्णिक ने अगदी बालवयात छोटे मोठे पडेल ते काम करण्यास सुरुवात केली होती. नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या कर्णिक ने आपल्या पेक्षा लहान मुलांच्या शिकवण्या घेतल्या, काही दुकानांमध्ये काम केले, टंक लेखक म्हणजे टाईप रायटिस्ट, शेअर बाजार, स्थावर - जंगम मालमत्ता बाजार आदित्यादी विविध क्षेत्रातील कामे त्यांनी त्यावेळेस केलीत.[]

त्यानंतर कर्णिक सौदी अरेबिया मध्ये गेल्या. तेथे त्यांनी सौदी मध्ये बुरखा घालून तेथील विमान कंपनीत हवाई सुंदरीचे काम केले. परंतु अल्पकालावधीत त्या कामात त्यांचे मन रमेनासे झाले. शेवटी कर्णिक भारतात परत आल्या आणि येथेच काम करू लागल्या. इ.स. १९९२ पासून त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या.[]

दरम्यान दोन वेळेस कर्णिक यांचे प्रेमप्रकरण जुळले होते. परंतु दोन्ही वेळी जोडीदाराच्या विश्वासघातामुळे त्या चांगल्याच दुखावल्या आणि शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अभिनयासोबतच त्यांनी अध्यात्मात आपले लक्ष केंद्रीत केले. आता त्या वेळोवेळी तरुण पिढीला अध्यात्माचे धडे सुद्धा देतात.[]

कर्णिक यांना दिग्दर्शक सुवेंदू राज घोष यांनी हिंदी चित्रपट मै मुलायम सिंग यादव मध्ये इंदिरा गांधींची भूमिका देऊ केली.[] या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी वरील लिखाण वाचण्यास तसेच त्यांच्या चित्रफिती बारकाईने अभ्यासण्यास सुरुवात केली.[]

कर्णिक यांना ही भूमिका देऊ केली तेव्हा मोठा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. याचे कारण देताना त्या म्हणतात,

मी राजकारणाचे अनुसरण करत नाही, पण मला दोन महिला राजकारण्यांनी मंत्रमुग्ध केले - इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर. दिग्दर्शक सुवेंदू राज घोष यांनी जेव्हा मला इंदिराजींची भूमिका देऊ केली, तेव्हा मी विस्मित झाले की, "खरंच… तुम्हाला खात्री आहे का? मला शंका आहे की त्यांच्यात आणि माझ्यात काही साम्य आहे". पण त्याचा विश्वास पक्का होता. म्हणून मग, मी त्यांच्यावरील लिखाणाचे वाचन केले आणि त्यांच्या आचारविचारांचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ पाहिले.

[]

अभिनय सूची

[संपादन]

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
  • मराठी
    • तिसरा डोळा
  • हिंदी
    • साथ साथ बनायेंगे एक आशियाना
    • शांती
    • आ गले लग जा
    • निली आँखें
    • तहकीकात
    • दास्तान (१९९५ सालची मालिका)
    • वो रहने वाली महेलोंकी
    • देवी
    • कानून

चित्रपट

[संपादन]
  • हिंदी
    • परदेस (१९९७)
    • मै सोलाह बरस की (१९९८)
    • ताल (१९९९)
    • जिस देश में गंगा रहता है (२०००)
    • ढाई अक्षर प्रेम के (२०००)
    • जोडी नंबर 1 (२००१)
    • यादे (२००१)
    • हां मैने भी प्यार किया है (२००२)
    • वाह! तेरा क्या कहना (२००२)
    • ये दिल (२००३)
    • तलाश:द हंट बिगीन ...
    • राजा हिंदुस्तानी
    • एक और एक ग्यारह (२००३)
    • मिस इंडिया: द मिस्ट्री (२००३)
    • खेल (२००३)
    • अंदाज (२००३)
    • तुझे मेरी कसम (२००३)
    • कुछ तो गडबड है (२००४)
    • मुझसे शादी करोगी (२००४)
    • बेवफा (२००५)
    • जमीर: द फायर विदीन (२००५)
    • शादी कर के फस गया यार (२००६)
    • आर्यन: अन् ब्रेकेबल (२००६)
    • वेलकम (२००७)
    • नहले पे दहला (२००७)
    • दे दणा दण (२००९)
    • जिंदगी तेरे नाम (२००९)
    • मेरी लाइफ में उसकी वाईफ (२०११)
    • एक्सचेंज ऑफर (२०११)
    • वेलकम बॅक (२०१५)
    • २०१६ द एंड (२०१७)
    • रक्तधार (२०१७) म्हणून
    • मशीन (२०१७)
    • मै मुलायम सिंग यादव (२०२१)
  • तेलगू
    • नुव्वू नेनु (२००१)
    • खलेजा (२०१०)
    • पलनाटी ब्राह्मणयुडू (२००३)
  • तमिळ
    • बाबा (२००२)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सुप्रिया कर्णिक" (हिंदी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Supriya Karnik | National Handloom Expo 08 | Photos Entertainment". Hindustan Times. 28 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Supriya Karnik Hot Pictures, stills, Supriya Karnik Hot posters". Moviespad.com. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Mother fatherwe love to hate : Celebrity Gossips". Fropki.com. 2008-05-13. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ a b c d "सउदी अरेबियामध्ये बुरखा घालून एअरहोस्टेसचे काम करायची ही मराठमोळी अभिनेत्री, हिंदीतही आहे फेमस". २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Main Mulayam Singh Yadav" (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  7. ^ a b "Want to take up projects where I get to play diverse characters: Supriya Karnik" (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]