राजाबाई टॉवर
राजाबाई टॉवर मुंबईतील एक इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे. हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते. १ मार्च, इ.स. १८६�� रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्या काळी याच्या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये झाला होता. राजाबाई टॉवर स्तंभ इमारतीचा वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हा होता.
स्वरूप
[संपादन]राजाबाई टॉवरच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफ आहे असे बांधकामाच्या पद्धतीवरून दिसून येते. बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे. वास्तूच्या खिडक्यांसाठी रंगीत काचांचा (स्टेन्ड ग्लास) वापर केला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |