मॅसिडोनिया
मॅसिडोनिया Република Северна Македонија मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Денес над Македонија | |||||
मॅसिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
स्कोप्ये | ||||
अधिकृत भाषा | मॅसिडोनियन | ||||
इतर प्रमुख भाषा | आल्बेनियन, तुर्की, रोमानी, सर्बियन | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | ज्योर्ज इव्हानोव्ह | ||||
- पंतप्रधान | निकोला ग्र्युव्स्की | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- क्रुस्येव्हो प्रजासत्ताक | 3–13 ऑगस्ट 1903 | ||||
- युगोस्लाव्हियामधील मॅसिडोनियाचे जनतेचे प्रजासत्ताक | 8 मार्च 1946 | ||||
- स्वातंत्र्य युगोस्लाव्हियापासून |
8 सप्टेंबर 1991 | ||||
- मान्यता संयुक्त राष्ट्रांद्वारे |
8 एप्रिल 1993 | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २५,७१३ किमी२ (१४८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.९ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २०,५८,५३९ (१४६वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८०.१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २,२१४.७ कोटी अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १०,७१८ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७३२ (उच्च) (८४ वा) (२०१३) | ||||
राष्ट्रीय चलन | मॅसिडोनियन देनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MK | ||||
आंतरजाल प्रत्यय | .mk | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८९ | ||||
मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Северна Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मॅसिडोनिया ह्या नावावरून ग्रीस ��� मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरू आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रे व युरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटो व युरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
इतिहास
[संपादन]रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. रोमन सम्राट डायोक्लेशनने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये ग्रीक व लॅटिन ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्लाव्ह लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून बायझेंटाईन साम्राज्य व बल्गेरियामध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर ओस्मान्यांची सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.
२०व्या शतकाच्या सुरुवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन बाल्कन युद्धांनंतर व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग सर्बियाच्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली.
अर्थतंत्र
[संपादन]मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील वार्षिक दरडोई उत्पन्न युरोपामध्ये खालच्या पातळीवर आहे.
खेळ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (मॅसिडोनियन मजकूर)