Jump to content

भाकरा नांगल धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाकरा धरण

भाकरा धरण
अधिकृत नाव गोविंदसागर
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत निर्मिती
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
सतलज नदी
स्थान बिलासपुर
लांबी ५२०
उंची २२६
रुंदी (तळाशी) १९१
बांधकाम सुरू १९४८
उद्‍घाटन दिनांक १९६३
ओलिताखालील क्षेत्रफळ १० दशलक्ष एकर
जलाशयाची माहिती
क्षमता ९.३४० किमी³
जलसंधारण क्षेत्र ५६,९८० किमी²
क्षेत्रफळ १६८.३ किमी²
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या ५×१०८ मेगावॅट, ५×१५७ मेगावॅट
स्थापित उत्पादनक्षमता १३२५
व्यवस्थापन भाखड़ा ब्यास प्रबन्ध बोर्ड
संकेतस्थळ http://bbmb.gov.in/english/menu2.asp
Pt. Jawaharlal Nehru with group of engineers who constructed Bhakra Dam 03

भाकरा नांगल धरण हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात येते. या भागाच्या पाहणीत हे लक्षात आल्यावर धरण बांधताना हार्वे स्लोकम या स्थापत्यशास्त्रज्ञाने त्या भागातील फुटके-तुटके खडक व माती बाजूला करून तेथे लाखो टन कॉंक्रीटची भर घातली व मगच धरण बांधले.