पंकज अडवाणी
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
पंकज अडवाणी ( २४ जुलै १९८५, पुणे) हा एक भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू आहे. आठ वेळा विश्व अजिंक्यपदे जिंकलेला अडवाणी ह्या खेळामधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू मानला जातो.
व्यक्तिगत माहिती
[संपादन]अडवाणी कुटुंबीय कुवेतला स्थायिक झाले होते, परंतु पंकजचा जन्म पुण्यातील नातेवाईकांच्या घरात झाला. आखाती युद्ध सुरू झाले आणि त्यामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग स्वीकारत अडवाणी कुटुंबीय बंगळुरू येथे स्थायिक झाले. पंकज सहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पंकजची भावासह बंगळुरूमधील ‘कर्नाटक बिलियर्ड्स-स्नूकर संघटने’त रमू लागला. अवघ्या बाराव्या वर्षी त्याने भावाचाच पराभव करून पहिली स्पर्धा जिंकली. संघटनेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सावूर यांचे लक्ष लहानग्या पंकजच्या कौशल्याकडे गेले आणि त्यांनी पंकजला दत्तकच घेतले! सावूर यांच्या घरामधील बिलियर्ड्स टेबलवर दिवसरात्र सराव घेत पंकजची क्रीडा-कारकीर्द घडू लागली. ज्युनिअर स्पर्धा गाजविल्यानंतर आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स-स्नूकर संघटनेच्या विश्वचषक स्पर्धामध्ये त्याच्या विजयमालिकेला २००३ पासून प्रारंभ झाला. २००५ साली पॉइंट्स आणि टाइम अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धाचे विश्वविजेतेपद पटकाविणारा पंकज अडवाणी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. हौशी खेळाडूंसाठीची स्पर्धा जिंकून तो विशीतच विश्वविजेता झाला. त्यानंतर आता ‘प्रोफेशनल’ स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावून त्याने याच वर्षी जाहीर करण्यात आलेला पद्मश्री किताब सार्थ ठरविला. २००४ साली अर्जुन पुरस्कार, २००६ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, एशियाडच्या सुवर्णपदकासह कित्येक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाले आहेत.
विजेतेपदे
[संपादन]- २०१०
- २०१० आशियाई खेळ सुवर्णपदक
- 2009
- जाग्तिक व्यावसायिक बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- 2008
- आय बी एस एफ विश्वविजेतेपद टाइम आणि पॉईंटस दोन्ही प्रकारात
- 2006
- २००६ आशियाई खेळ सुवर्णपदक
- 2005
- आय बी एस एफ् विश्वविजेतेपद टाइम आणि पॉईंटस दोन्ही प्रकारात
- आशियाई बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- भारतीय बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- जुनियर भारतीय स्नुकर स्पर्धेचे विजेतेपद
- जुनियर भारतीय बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- डब���ल्यु एस् ए स्पर्धा
- 2004
- डब्ल्यु एस् ए स्पर्धा
- 2003
- आय बी एस एफ् विश्वविजेतेपद स्नुकर
- जुनियर भारतीय बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- जुनियर भारतीय स्नुकर स्पर्धेचे विजेतेपद
- 2001
- जुनियर भारतीय बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
- 2000
- जुनियर भारतीय बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद
बाह्य दुवे
[संपादन]2015 विश्वकप विजेता