फातोर्डा स्टेडियम
Appearance
(नेहरू मैदान, मडगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | फातोर्डा, मडगांव, गोवा, भारत |
गुणक | 15°17′21″N 73°57′44″E / 15.28917°N 73.96222°E |
स्थापना | १९८९ |
आसनक्षमता | २७,३०० |
मालक | गोवा क्रीडा प्राधिकरण |
यजमान | भारतीय क्रिकेट संघ |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
२५ ऑक्टोबर १९८९: ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
२४ ऑक्टोबर २०१०: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
यजमान संघ माहिती | |
चर्चिल ब्रदर्स (२००६-२०१४) डेम्पो (२००६-सद्य) साळगावकर (२००६-सद्य) स्पोर्टिंग क्लब डी गोवा (२००९-सद्य) गोवा एफ.सी. (२००९-सद्य) | |
शेवटचा बदल २२ जून २०१६ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
अधिकृतपणे जवाहरलाल नेहरू मैदान म्हणून ओळखले जाणारे फातोर्डा मैदान, हे गोव्यातील मडगाव स्थित एक विविध खेळांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी वापरण्यात आले आहे. गोव्यामधील हे एकमेव आंतरराष्ट्रीय मैदान असून याची प्रेक्षक क्षमता २७,३०० इतकी आहे. मैदानाची स्थापाना १९८९ मध्ये झाली असून, त्याचे मालकी हक्क गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे आहेत.
क्रिकेटचा विचार करता ह्या मैदानावर १९८९ पासून अवघे ६ क्रिकेट सामने झाले असून, त्यामध्ये भारतीय संघाचे ३ सामने झाले आहेत. ह्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.