Jump to content

टंगस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टंग्स्टन या पानावरून पुनर्निर्देशित)

(W) (अणुक्रमांक ७४) रासायनिक पदार्थ. टंगस्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे.


,  W
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
- आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


W

गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | विकिडेटामधे

टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. त्याचा वितळणबिंदू ३४००° से. असून, उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबिंदूमुळे विद्युत अभियांत्रिकीमध्ये टंगस्टनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शुद्ध टंगस्टनची तार दर चौरस सें.मी.ला ४० टन पर्यंत ताण सहन करू शकते. टंगस्टन अतिशय तन्यही आहे. अतिशय बारीक केलेली १०० कि.मी. लांबीची टंगस्टनची तार वजनाला फक्त २५० ग्रॅम एवढी भरते. अशी अतिशय बारीक तार विद्युत दीपांमध्ये (बल्ब) वापरली जाते व अशी तप्त तार प्रकाश देते. टंगस्टनचा या कामी उपयोग होण्यापूर्वी कार्बन, टॅंटॅलम किंवा ऑस्मियमच्या तारा वापरल्या जात पण यापैकी कोणतीही तार टंगस्टनएवढी विश्वसनीय सेवा देत नाही.

टंगस्टनच्या उच्च वितळणबिंदूमुळे ज्वालाविरोधी द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एक्स रे उपकरणे, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स यांमध्ये आणि रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अति उष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन वापरतात. म्हणजे जेथजेथे अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचे असेल तेथेतेथे टंगस्टनचा वापर होतो.

अतिउच्च कठीणता असणारे आधुनिक मिश्रधातू हे टंगस्टन कार्बाइड व इतर मूलद्रव्ये जसे टायटॅनियम, नायोबियम व टॅंटॅलम कार्बाइड यांचे मिश्रण असते. या पदार्थांना सर्मेट पदार्थ असे म्हणतात व हे पदार्थ १०००° से. पर्यंत स्वतःचे काठिण्य टिकवून ठेवतात. टंगस्टिक आम्लासह लोखंड तापवून फेरोटंगस्टन हा अतिशय कठीण मिश्रधातू तयार केला जातो.

टंगस्टनची घनता जडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरले जाते. दागदागिने बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो.

१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग असतात. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आलेली असते.

टंगस्टन जवळपास निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले किंवा, अल्कली यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. टंगस्टन सर्वात जास्त वापरले जाते ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी.

शुद्ध स्वरूपातील टंग्स्टन

फार पूर्वी धातुशास्त्रज्ञांच्या ध्यानी आले की खनिज��पासून कथील वेगळे करतांना कधीकधी ते खूपच कमी प्रमाणात मिळते, आणि याचे कारण खनिजात असलेले तपकिरी किंवा पिवळसर-करड्या रंगाचे दगड हे होते. या खनिजातील दगड शील यांनी वर्गीकृत केले. १८७१ साली कार्ल विल्हेम शील या जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने टंगस्टनचा सोध लावला. शील हे व्यवसायाने औषधविक्रेता होते आणि रसायनशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. टंगस्टनचे वेगळे अस्तित्त्व शील यांनी १८७१ साली जरी सिद्ध केले तरी १८७३ साली त्यांचेच विद्यार्थी डेलह्युजर या रसायनशास्त्रज्ञाने खनिजापासून वोल्फ्रॅम वेगळे काढले.