घेवडेश्वर
Appearance
महाशिवरात्र निमित्त उंच डोंगरावर असलेल्या प्राचीन श्री क्षेत्र घेवडेश्वर(मु-हा) येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले .... या ठिकाणाहून अनेक गड किल्ल्यांचे दर्शन झाले, यामध्ये राजगड, तोरणा, रायगड, पुरंदर, रोहिडेश्वर, रायरेश्वर हे किल्ले पाहता आले, तसेच भोर तालुक्यातील भाटघर व देवघर धरणे एकाच ठिकाणाहून पाहण्याचा योग आला. वेळवंडचे संपूर्ण खोरे या ठिकाणाहून दिसते तसेच संपूर्ण भोर व अंबावडे परिसर व महुडे खोरे स्पष्ट दिसते. या सर्व कारणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधायचे योजिले होते.