Jump to content

इंद्रप्रस्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतिहास


द्रौपदीबरोबर पाच पांडवांनी विवाह केला त्यामुळे अधर्म केल्याचा आरोप ठेवून त्यांना हस्तिनापुरातून निष्कासित करण्याचा आदेश महाराज धृतराष्ट्र यांनी दिला.त्यामुळे आपल्यालाही या वडिलोपार्जित राज्यात वाटा मिळाला पाहिजे असे पांडवांनी ठरवले. ही मागणी त्यांनी हस्तिनापुराच्या सभेत मांडली. अखेरीस प्रचंड विरोधानंतर हस्तिनापुराचे दोन भाग करण्यात आले व पांडवांना खांडवप्रस्थ देण्याचे ठरविण्यात आले.

खांडवप्रस्थ

यमुनेच्याकाठी खांडावप्रस्थनावाचा भाग होता. तेथे खांडववन होते.या खांडववनात नागांचे साम्राज्य होते.या नागांचा तक्षक नाग हा राजा होता.या नागांना इंद्र देवाचे संरक्षण प्राप्त होते. तक्षक व त्याच्या सेनेला या खांडावप्रस्थात मनुष्यांचा वावर नको होता त्यामुळे त्यांनी हा भाग शुष्क करून टाकला होता.


खांडवप्रस्थाचे इंद्रप्रस्थ

युधिष्ठीर आपल्या बंधू, द्रौपदी, सेना, प्रजाजन यांबरोबर खांडवप्रस्थात आला. भूमिपुजनासाठी द्रौपदीने या जमिनीवर पाणी ओतले व यामुळे रागावलेल्या नागांनी सर्वांवर हल्ला केला.या हल्ल्यात पांडव व द्रौपदी सोडून इतर सर्वजण विषबाधित झाले. प्रजाजानंशिवाय असलेले राज्य राज्य नसते म्हणून त्या विषबाधित प्रजाजनांना जिवंत करणे आवश्यक होते. तक्षक विष परत घेण्यास तयार नव्हता त्यामुळे पांडवांनी खांडववनाला आग लावली. या आगीतून वाचण्यासाठी व पांडवांना पराभूत करण्यासाठी तक्षकाने इंद्र देवांना बोलावले. राजकुमार अर्जुन हा इंद्र देवांचाच पुत्र होता. त्यामुळे इंद्र देवांविरुद्ध अर्जुन लढायला सिद्ध झाला. इंद्रदेव व अर्जुनात घनघोर युद्ध झाले. अखेरीस इंद्रदेवाने वज्रास्त्र अर्जुनाच्यादिशेने फेकले व अर्जुनानेसुद्धा आपला सर्वशक्तीशाली बाण सोडला. ही अस्त्रे एकमेकांवर आदळणार एवढ्यात श्रीकृष्णांनी आपले सुदर्शनचक्र सोडून त्या अस्त्रांना विफल केले. इंद्र देवाला श्रीकृष्णाने समजावले व अखेरीस पांडवांना न मारण्याचे त्यांनी मान्य केले.इंद्र देवाने पांडवांसाठी शहर बनविण्याचे वचन दिले. योग्य भूमिपुजनेनंतर शहर बनण्यास सुरुवात झाली. तक्षकाच्या राज्यातील एका वाचलेल्या नागाने पांडवांसाठी मायासभा निर्माण केली व या इंद्रपुरीसारख्या दिसणाऱ्या नगरला इंद्रप्रस्थ असे नाव ठेवण्यात आले.

इंद्रप्रस्थ स्वतंत्र राज्य


प्रारंभी इंद्रप्रस्थावर हस्तिनापुराचा ध्वज फडकत होता. नगर बांधणी पूर्ण झाल्यावर इंद्रप्रस्थाचा नवीन ध्वज तयार करण्यात आला. हा ध्वज शुभ्र व सोनेरी सिंह चेहरा असलेला होता. त्यानंतर युधिष्ठीराने स्वतःला राजा म्हणून घोषित केले.

राजसूर्य यज्ञ


मगधचा जरासंध व इतर सम्राटांना पराजित केल्यावर युधिष्ठिराने राजसूर्य यज्ञ केला व तो आर्यवर्ताचा सम्राट बनला. या यज्ञानंतर दुर्योधनाने युधिष्ठिराचा अपमान केल्याने त्याला, दुःषासनाला व अंगराज कर्णाला शस्त्र त्यागण्याची शिक्षा द्रौपदीने दिली. हा त्याला त्याचा अपमान वाटला व या दिवसापासून खऱ्या महाभारताच्या पर्वाला सुरुवात झाली.

पांडवांच्या अखेरीस इंद्रप्रस्थ


पांडव महाप्रस्थानाला निघाले तेव्हा त्यांनी परीक्षितला हस्तिनापुराचा तर वज्रला इंद्रप्रस्थाचा राजा करण्यात आले.

कृष्ण आणि अर्जुन एका ऊंच टोकावरून इंद्रप्रस्थ शहराचे विहंगम दृश्य बघताना