Jump to content

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.एस. सुब्बुलक्ष्मी

एम.एस. सुब्बुलक्ष्मी
आयुष्य
जन्म १६ सप्टेंबर, इ.स. १९१६
जन्म स्थान मदुरै
मृत्यू ११ डिसेंबर, इ.स. २००४
मृत्यू स्थान चेन्नई, तमिळनाडू
संगीत साधना
गुरू शेम्मंगुडी श्रीनिवास अय्यर, पंडित नारायणराव व्यास
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३०-२००४
गौरव
पुरस्कार पद्मभूषण (इ.स. १९५४), मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९७४), पद्मविभूषण (इ.स. १९७५) भारतरत्‍न (इ.स. १९९८)

मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बुलक्ष्मी (तमिळ: மதுரை சண்முகவடிவு சுப்புலட்சுமி ; रोमन लिपी: M. S. Subbulakshmi) (१६ सप्टेंबर, ��.स. १९१६ - ११ डिसेंबर, इ.स. २००४) या मॅगसेसे पुरस्कारभारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या.

कुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या , सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. सहाव्या इयत्तेत असतानाच शिक्षकांनी मार दिल्यामुळे सुब्बलक्ष्मी यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅसेटचे उदघाटन केले. त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार असलेल्या त्यागराजन यांच्याशी त्या १९४० साली विवाहबद्ध झाल्या. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपले संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केले. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.

सुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.

सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते

[संपादन]
  • चाकर राखो जी (हिंदी)
  • पग घुंगरु बॉंध मीरा नाचे रे
  • भज गोविंदम
  • मधुराष्टकम्
  • मोरे ऑंगना में (हिंदी)
  • मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी)
  • श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌
  • विष्णूसहस्रनाम
  • वृंदावन कुंज भवन (हिंदी)
  • हनुमान चालिसा
  • हरि तुम हरो (हिंदी)

पुरस्कार

[संपादन]