जून २३
दिनांक
(२३ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७४ वा किंवा लीप वर्षात १७५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५३२ - हेन्री आठवा व फ्रांस्वा पहिल्याने चार्ल्स पाचव्याविरुद्ध गुप्त कट रचला.
सतरावे शतक
संपादन- १६८३ - पेनसिल्व्हेनियात विल्यम पेनने स्थानिक लेनी लेनापे जमातीशी मैत्री करार केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - ओक्लाहोमातील फोर्ट टौसन येथे दक्षिणेच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली.
- १८९४ - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१९ - एस्टोनियन मुक्ती युद्ध - जर्मन सैन्याची हार. एस्टोनियात हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो.
- १९४० - दुसरे महायुद्ध - एडॉल्फ हिटलरने पराभूत पॅरिसला भेट दिली.
- १९५६ - गमाल अब्दुल नासर इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९५९ - नॉर्वेतील स्टालहाइम शहरात हॉटेलला आग. ३४ ठार.
- १९६८ - आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्समध्ये फुटबॉल सामन्या दरम्यान चेंगराचेंगरी. ७४ ठार.
- १९७९ - दुसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने इंग्लंडला ९२ धावांनी हरवले.
- १९८५ - दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा एर इंडियाच्या कनिष्क या बोईंग ७४७ प्रकारच्या विमानात स्फोट. ३२९ ठार.
- १९९० - मोल्दाव्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ४७ - फेरो टॉलेमी पंधरावा.
- १७६३ - जोसेफिन, फ्रांसची सम्राज्ञी.
- १८९४ - एडवर्ड आठवा, इंग्लंडचा राजा.
- १९१० - गॉर्डन बी. हिंकली, मोर्मोन चर्चचा अध्यक्ष.
- १९१२ - ऍलन ट्युरिंग, इंग्लिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९१६ - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - कॉस्टास सिमिटिस, ग्रीक पंतप्रधान.
- १९३७ - मार्टी अह्तीसारी, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - व्हिंट सर्फ, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व इंटरनेटच्या जनकांपैकी एक.
- १९५७ - डेव्हिड हॉटन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - रामनरेश सरवण, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ७९ - व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
- १०१८ - हेन्री पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १५१६ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
- १८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, संस्थापक-भारतीय जनसंघ; शिक्षणतज्ञ.
- १९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारतीय भूसेना प्रमुख.
- १९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.
- १९��६ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीक पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस (१९४८ पासून)
- विजय दिन - एस्टोनिया.
- पितृ दिन - पोलंड.
- संत जोनास दिन - लिथुएनिया.
- राष्ट्र दिन - लक्झेम्बर्ग.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)