जून ४
दिनांक
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५५ वा किंवा लीप वर्षात १५६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७९२ - कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.
- १७९४ - ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स जिंकली.
एकोणविसावे शतक
संपादन- १८०४ - आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
- १८७६ - न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकॉंटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
- १८७८ - ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
विसावे शतक
संपादन- १९१२ - मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.
- १९२० - ट्रायानॉनचा तह.
- १९२८ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष झ्हॉंग झुओलिनची हत्या.
- १९३९ - ज्यूंचे शिरकाण - युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध-मिडवेची लढाई सुरू.
- १९४३ - आर्जेन्टिनामध्ये लश्करी उठाव, रमोन कॅस्टियोची हकालपट्टी.
- १९४४ - अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-५०५ ही पाणबुडी पकडली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याने रोम जिंकले.
- १९६७ - ब्रिटिश मिडलॅंड विमान कंपनीचे विमान कोसळले. ७२ ठार.
- १९७० - टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७९ - घानामध्ये लश्करी उठाव.
- १९८९ - आयातोल्ला रुहोल्लाह खोमेनीच्या मृत्यूनंतर आयातोल्ला अली खामेनेई इराणच्या नेतेपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- १९१८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
- १९४७ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
- १९६२ - चार्ल्स विल्यम बीब, अमेरिकन निसर्गतज्ञ.
- १९६२ - यशवंतराव मार्तंडराव मुकणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- १९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ञ, शिक्षणतज्ञ.
- २०२३ - सुलोचना लाटकर, मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्र सेवादल दिवस.
- हुतात्मा दिन.
- विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
- सेना दिन - फिनलंड.
- स्वातंत्र्य दिन - टोंगा.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)