शोध युग

शोध युग हा जगाच्या इतिहासातील १५ व्या ते १७व्या शतकादरम्यानचा एक काळ होता जेव्हा युरोपीय शोधकांनी जगातील इतर भूभाग शोधण्याची मोठी मोहीम हाती घेतली होती. ह्या काळामध्ये स्पॅनिश व पोर्तुगीज शोधकांनी आफ्रिका, अमेरिका, आशिया व ओशनिया खंडांमधील अनेक भूभागांचा शोध लावला.
तेराव्या शतकाच्या अखेरीस मार्को पोलोने आशियाची सफर पूर्ण केली. १४९२ साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला तर १४९८ साली वास्को दा गामा सागरी मार्गाने भारतापर्यंत पोचला. पोर्तुगीज खलाशी १५१२ साली मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात इंडोनेशियाच्या मालुकू द्वीपसमूहावर पोचले. १५२२ साली फर्डिनांड मेजेलनने जगयात्रा सुरू केली. १५९५ साली डच, फ्रेंच व इंग्लिश शोधक ह्या शोध मोहिमेत सामील झाले. १६०८ साली ऑस्ट्रेलिया, १६४२ साली न्यू झीलंड व १७७२ साली हवाईचा शोध लावण्यात आला. ह्याच दरम्यान रशियन शोधकांनी सायबेरियावर सत्ता प्रस्थापित केली.