विशाखापट्टणम
विशाखापट्टणम విశాఖపట్నం |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | आंध्र प्रदेश |
जिल्हा | विशाखापट्टणम जिल्हा |
क्षेत्रफळ | ६८१.९६ चौ. किमी (२६३.३१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १७७ फूट (५४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १७,३०,३२० |
- घनता | २,५३७.३ /चौ. किमी (६,५७२ /चौ. मैल) |
- महानगर | २०,९१,८११ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
विशाखापट्टणम (तेलुगू: విశాఖపట్నం) (जुने नाव विजगापट्टण Vizagapattan) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे.
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे.
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम कलिंग साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे विजयनगर तर १६व्या शतकात मुघलांची सत्ता होती. १८व्या शतकात फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे ब्रिटिशांची राजवट आली. ती भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती.
यिशाखापट्टणम या शहराला लोक अजूनही वैझॅग (Vizag) या संक्षिप्त नावाने ओळखतात.
जनसांख्यिकी
[संपादन]२०११ सालच्या जनगणनेनुसार विशाखापट्टणमची लोकसंख्या १७,३०,३२० इतकी होती. येथील लिंग गुणोत्तर ९७७ तर साक्षरता दर ८२.६६% होता.
वाहतूक
[संपादन]विशाखापट्टणम शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राच्या विशाखापट्टणम विभागाचे मुख्यालय येथील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, च���न्नई, कोलकाता इत्यदी अनेक प्रमुख शहरांसाठी येथून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात.
सुवर्ण चतुष्कोणाचा भाग असलेला राष्ट्रीय महामार्ग ५ विशाखापट्टणममधून धावतो.
विशाखापट्टणम विमानतळ येथील प्रमुख विमानतळ येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच दुबई, क्वालालंपूर इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-01-31 at the Wayback Machine.