लष्करी औद्योगिक संकुल
देशाच्या लष्करी आणि संरक्षण उद्योग यांची एकमेंकांशी असलेली युती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | iron triangle | ||
---|---|---|---|
उपवर्ग | alliance, industrial complex, tech industry | ||
स्थान | अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
भाग |
| ||
| |||
लष्करी औद्योगिक संकुल ही देशाचे लष्कर आणि त्याला पुरवठा करणाऱ्या संरक्षण उद्योगांची अनौपचारिक युती आहे, ज्या कडे सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकणारे एकमेकांमधे गुंतलेले हितसंबंध या दृष्टीने पाहिले जाते.[१][२][३][४] ह्या सर्व नातेसंबंधांना जोडणारा कळीचा मुद्दा म्हणजे सरकार आणि संरक्षण-विचार श्रेणी असणाऱ्या कंपन्या यांना होणारे फायदे - एका बाजूला युद्धासाठी आवश्यक सामग्री मिळवण्यात होणारा फायदा आणि दुसऱ्या बाजूला ती सामग्री पुरवून कमावलेला फायदा.[५] अमेरिकेच्या लष्करा मागील प्रणालीच्या संदर्भात बहुतेक वेळा हा शब्द वापरला जातो, जेथे ही व्यवस्था प्रचलित आहे आणि [६] आणि १७ जानेवारी १९६१ रोजी राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांच्या निरोपाच्या भाषणातील त्याच्या वापरा नंतर त्याला लोकप्रियता मिळाली.[७][८] २०११ मध्ये अमेरिकेने त्याच्या पुढील १३ राष्ट्रे एकत्रित केल्यास, त्यापेक्षा अधिक खर्च लष्करावर केला (पूर्ण अंकात).[९]
अमेरिके संदर्भात, याला दिलेली संज्ञा कधीकधी लष्करी-औद्योगिक-काँग्रेसी संकुल इथपर्यंत वाढविली जातो, ज्यामध्ये यु.एस. काँग्रेसला यामध्ये जोडून जे तीन पक्षीय संबंध तयार होतात त्याला 'लोह त्रिकोण' म्हणतात.[१०] यातील संबंधांमध्ये राजकीय योगदान, लष्करी खर्चासाठी राजकीय मान्यता, नोकरशाहीस समर्थन देण्यासाठी दबाव आणि उद्योगाची देखरेख याचा समावेश होतो; किंवा अधिक विस्ताराने यामध्ये कंत्राटांचे जाळे आणि व्यक्ती तसेच संरक्षण कंत्राटदारांचे उद्योगसमूह आणि संस्था, खाजगी लष्करी कंत्राटदार, पेंटागॉन, काँग्रेस आणि कार्यकारी विभाग यांच्यातील पैसा व साधनसंपत्तीचा प्रवाह याचा समावेश होतो.[११]
यासारखे एक तत्त्व मूलतः डॅनियल गेरिन यांनी आपल्या १९३६ च्या 'फॅसिझम ॲण्ड बिग बिझनेस' मध्ये तत्कालिक अवजड उद्योगांना फॅसिस्ट सरकारने दिलेल्या पाठिंब्या संदर्भात व्यक्त केले आहे. याची व्याख्या "उच्चस्तरीय शस्त्रास्त्रांचा विकास आणि ती बाळगण्यात, वसाहती बाजारपेठांचे संरक्षण करण्यात तसेच अंतर्गत घडामोडींच्या लष्करी-सामरिक संकल्पना निर्मितीत; मानसिक, नैतिक आणि भौतिक हितसंबंध गुंतलेल्या गटांची, अनौपचारिक आणि कायम बदलत जाणारी आघाडी" अशी करता येईल.[१२] फ्रांज लिओपोल्ड न्यूमन यांच्या 'बेहेमोथ: द स्ट्रक्चर अँड प्रॅक्टिस ऑफ नॅशनल सोशलिझम' या पुस्तकात, १९४२ मध्ये नाझीवाद लोकशाही राज्यात कसा सत्तास्थानी आला याचा अभ्यास प्रदर्शित झाला आहे.
अशा प्रकारचे संकुल, अमेरिकेला पहिल्या महायुद्धात 'शत्रूशी व्यापाराचा कायदा, १९१७' कडे घेऊन गेले.
व्याख्या
[संपादन]अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि दुसऱ्या महायुद्धातील पंच तारांकित सेनापती असलेले ड्वाईट डी. आयझेनहोवर यांनी आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात १७ फ़ेब्रुवारी १९६१ रोजी ह्या संकल्पनेचा प्रथम[१३] वापर केला:
शांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपली लष्करी आस्थापने. आपली शस्त्रास्त्रे इतकी प्रबळ असली पाहिजेत की, जेणेकरून कोणत्याही शत्रूला आपल्यावर हल्ला करण्याची हिंमत होणार नाही, कारण त्या हल्ल्यामध्ये शत्रू स्वत:चाच नाश घडवून आणणार आहे हे त्याला माहित असणार आहे...
मोठ्याप्रमाणात लष्करी आस्थापने आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणारे कारखाने यांची एकत्रितपणे होणारी वाढ नव्याने अमेरिकेला अनुभवास येत आहे. त्या अनुभवाचा परिणाम आपल्याला प्रत्येक क्षेत्रात म्हणजेच आर्थिक, राजकीय अगदी अध्यात्मिक पातळीवरही - प्रत्येक शहरात, प्रत्येक प्रशासनिक कार्यालयांमध्ये, केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यालयात प्रतिबिंबीत होताना दिसत आहे. आपल्याला या बदलाची गरजही ओळखली पाहिजे आणि ती आम्हाला मान्यही आहे. असे असले तरीही आपल्याला ह्या घडामोडींच्या गंभीर परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपली जमीन, संसाधने आणि उदरनिर्वाह ह्या घडामोडींमध्ये प्रभावित होणार आहे, त्यामुळेच हा आपल्या सामाजिक व्यवस्थेलाच धक्का आहे. अमेरिकी संघाच्या कौंन्सिलमध्ये, 'आपल्याला स्वत:ला ह्या अवाढव्य वाढत असणाऱ्या प्रभावापासून वाचवलेच पाहिजे, तो स्पष्टपणे लष्करी औद्योगिक संकुलातून येताना दिसत आहे किंवा नाही त्याच्याकडे आपल्याला जा��्त लक्ष देण्याची गरज नाही'. या घडामोडींमधून सत्तेचे विस्थापन होऊन आपल्या देशाचे मोठे नुकसान होत आहे आणि ते पुढेही होत जाणार आहे, असे मला दिसत आहे. आपल्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाही प्रक्रियांवर कसल्याही प्रकारे मर्यादा निर्माण होईल एवढे ह्या घडामोडींचे वजन वाढू न देणेच आपल्या हिताचे आहे. म्हणूनच आपण कोणतीही बाब गृहित धरुन चालणार नाही. फक्त आणि फक्त जागरूक आणि सज्ञान नागरिकच संरक्षणाच्या मोठ्या लष्करी आणि सैनिकी यंत्रणांचे योग्य एकत्रिकरण घडवून आणू शकतात आणि त्यांद्वारे आपल्या सुरक्षा आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याच्या शांतीपुर्ण पद्धती आणि ध्येये प्रत्यक्षात येऊ शकतील.
ही संकल्पना सुरुवातीला "युद्धावर आधारित उद्योग" अशी संकल्पना आहे असे उल्लेखले जात होते परंतु नंतरच्या आयझेनहावर यांच्या भाषणाच्या मसुद्यांमध्ये बदल होत गेले आणि शेवटाला प्रत्यक्ष भाषणात ती "लष्करी" म्हणून वापरण्यात आली असे त्याकाळच्या मौखिक इतिहासातून स्पष्ट होते.[१४] गिओफ़्रे पेरेट यांनी आयझेनहावर यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख केला आहे की, त्यांच्या भाषणाच्या एका मसुद्यामध्ये ही संकल्पना "लष्करी-औद्योगिक- काँग्रेशनल संकुल" असा आहे, ज्यातून अमेरिकेच्या संसदेचा त्यातील मोठा सहभाग नोंदवला जात होता, परंतु प्रत्यक्ष भाषणाच्या वेळी, त्या वेळच्या नवनिर्वाचित सत्ताधारी लोकांना दुखाविले जाऊ नये म्हणून हे शब्द बदलण्यात आले.[१५] जेम्स लेडबिटर यांचे असे म्हणणे आहे की, ह्या सर्व गैरसमजुती आहेत आणि ही संकल्पना आधीच्या मसुद्यांमध्ये नक्की वेगळी होती की नाही याचे काहीही पुरावे उपलब्ध नाहीत; याच धर्तीवर डग्लस ब्रिंकले यांच्यामते ही संकल्पना आधी "लष्करी-औद्योगिक-वैज्ञानिक संकुल" अशी होती.[१६] शिवाय हेन्री गिरोक्स यांच्या मते मुळात ही संकल्पना "लष्करी-औद्यागिक-विद्यापीठीय संकुल" अशी होती.[१७] आधुनिक "लष्करी-औद्यिकिग संकुलाची" संकल्पना मांडण्याचे प्रयत्न आयझेनहावर यांच्या आधीही झाले होते. विनफ़िल्ड डब्लू. रेईफ़्लेयर यांच्या "परराष्ट्र धोरणे" ह्या १९४७ साली लिहिलेल्या लेखनातही ही संकल्पना वापरलेली लेडबिटार यांना आढळली.[१८] १९५६ मध्ये सी. व्राईट मिल्स या समाजशास्त्रज्ञांनी आपल्या "द पावर इलिट" या त्यांच्या पुस्तका मध्ये असे प्रतिपादन केले आहे की, लष्करातील अधिकारी, त्याला जोडलेले व्यवसाय आणि राजकीय नेते, यांचे एकमेकांशी जोडून, एकमेकांचे हितसंबंध सांभाळत चाललेले उद्योग-धंदे हेच खरे आपल्या राज्याचे नेते होते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे लोकशाही पद्धतीला तरी शक्य नाही.[१९]
फ़्रेडरिक हायक यांनी आपल्या १९४४ सालच्या "द रोड टू सर्फ़डोम" ह्या पुस्तकात दुसरा महायुद्ध दरम्यान निर्माण झालेल्या औद्योगिक एकाधिकारशाही मधून प्रभावित झालेल्या राजकीय क्षेत्राबद्दल आपले मत मांडतात;
या युद्धानंतर एक बाब नक्की होणार आहे ती म्हणजे, युद्धात सहभागी अनेक पुरुषांना जिथे "क्रूर नियंत्रणाची सत्ता" चाखायला मिळाली आहे त्यांना "शांततेच्या काळात" स्वत:ला संयमी ठेवणे खुप कठीण जाणार आहे."[२०]
व्हियेतनाम युद्धाच्या काळातील एक कार्यकर्ता, सेय्मोर मेल्मान यांनी ह्या संकल्पनेचा अनेकदा वापर केला आणि शित युद्धाच्या संपूर्ण काळामध्ये ते ही संकल्पना वापरत राहिले. जोर्ज केनन यांनी नोर्मन कझिन यांच्या 1987 सालच्या "द पॅथोलॉजी ऑफ़ पॉवर" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात, जर तो सोव्हिएत संघ समुद्रात बुडाला असता तर अमेरिकेचे लष्करी औद्योगिक संकुलात एवढा विकास झालाच नसता, शिवाय पुढील काळात सोव्हिएतच्या तोडीचे दुसरे काहीतरी जगामध्ये वाईट होणार नसते तर त्याच्या सारखा अमेरिकेच्या अर्थकारणाला मोठा धक्का दुसरा नव्हता."[२१] जेम्स कुर्थ यांनी १९९० मध्ये प्रतिपादन केले, "१९८० च्या दशकाच्या मध्यावर ही संकल्पना सार्वजनिक चर्चांमधून बाहेर पडली", त्यांचे पुढे असेही म्हणणे होते की, "शीत युद्धाच्या काळातील लष्करी औद्यिगीक संकुलाचा शस्त्र खरेदीवर निर्माण झालेल्या प्रभावाबद्दल भाष्य करणारी सर्व त्यावेळी ताकदवान ठरलेली विधाने आताच्या परिस्थितीला लागू पडत नाहीत.[२२] पी.डब्लू. सिंगर यांचे खाजगी लष्करी आस्थापनां विषयीचे पुस्तक "प्राव्हेट मिलिटरी कंपनीज" हे दाखवून देते की, खाजगी उद्योग, आणि त्यातले ही माहितीच्या क्षेत्रात काम करणारे उद्योग सतत अमेरिकेच्या फ़ेडरल आणि पेंटागॉनच्या संपर्कात असतात.[२३]
भाषातज्ञ आणि अराजकतावादी नोम्न चोम्स्की यांनी असे प्रतिपादन केले आहे की, "लष्करी औद्योगिक संकुल ही संकल्पना वास्तविक पातळीवर एक छद्मनाम आहे कारण, मुळात त्या प्रक्रियेमध्ये उभे राहिलेले प्रश्न फक्त लष्करी आणि तेव्हढेच मर्यादित नाहीत."[२४] त्यांचे असे म्हणणे होते की, "असे कसलेही लष्करी-औद्योगिक संकुल अस्तित्वात नाही: ही फक्त औद्योगिक व्यवस्था ह्या नाहीतर त्या नावाखाली कार्यरत असताना आपल्याला दिसते आहे."[२५]
शीत युद्धा नंतर
[संपादन]शीतयुद्धा नंतरच्या काळात अमेरिकेतील संरक्षण कंत्राटदार सरकारच्या तथाकथित शस्त्रास्त्रांवरील खर्चातील कपाती बाबत तक्रार करू लागले.[२६] त्यांना रशिया - युक्रेन सारख्या तणावांमधिल वाढीमध्ये शस्त्रांचा खप वाढवण्याची संधी दिसली, त्यामुळे त्यांनी लष्करी साधनांवर जास्त खर्च करण्यासाठी, राज्यव्यवस्थेवर थेट आणि राष्ट्रीय संरक्षण उद्योग संघटनेसारख्या औद्योगिक दबावगटांमार्फत दबाव आणण्यास सुरुवात केली.[२७] लेक्सिंग्टन संस्था आणि अटलांटिक परिषद सारख्या पेंटागॉन कंत्राटदार-अनुदानित अमेरिकी विचार गटांनी रशियाचा ज्ञात धोका पाहता संरक्षण खर्च वाढवण्याची मागणी केली.[२७][२८] इंटरनॅशनल पॉलिसी सेंटरच्या आर्म्स ॲण्ड सिक्युरिटी प्रोजेक्टचे संचालक विल्यम हर्टुंग यांसारख्या स्वतंत्र पाश्चात्य निरीक्षकांनी म्हणले आहे की "रशियाच्या आक्रमक लष्करी शक्तीप्रदर्शनाचा शस्त्रनिर्मात्यांना अतिरिक्त लाभ झाला आहे कारण जरी पेंटागॉन कडे अमेरिकेवर आलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष धोक्याला उत्तर देण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसा असला तरी ही परिस्थिती पेंटागॉनने संरक्षण खर्च वाढवावा या युक्तिवादचा महत्त्वाचा भाग झाली".[२७][२९]
वर्तमान उपयोग
[संपादन]सिप्रिच्या माहिती प्रमाणे, २००९ मधील जगाचा एकूण लष्करी खर्च १५३१ अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. त्याच्या ४६.५%, म्हणजे अंदाजे ७१२ अब्ज अमेरिकी डॉलर, अमेरिकेने खर्च केले.[३१] उत्पादनाचे खाजगीकरण आणि लष्करी तंत्रज्ञानाचा शोध याचा अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासाशी गुंतागुंतीचा संबंध निर्माण झाला. अमेरिकेचा २००९ आर्थिक वर्षाचा संरक्षण अर्थसंकल्प ५१५.४ अब्ज अमेरिकी डॉलरचा होता. आणीबाणीचा विशेषाधिकारातील खर्च आणि परिशिष्ट खर्च पकडता, एकूण खर्च ६५१.२ अब्ज अमेरिकी डॉलर इतका येतो.[३२] यामधे संरक्षण विभागाच्या अर्थसंकल्पा बाहेरील अनेक लष्कराशी संबंधित साधनांचा समावेश नाही. एकंदरीत अमेरिकेचे केंद्र सरकार दरवर्षी साधारणपणे १००० अब्ज अमेरिकी डॉलर संरक्षणाशी संबंधित उद्देशासाठी खर्च करते.[३३]
सलोन ह्या संकेतस्थळावर आलेल्या बातमीनुसार, "जरी २०१० पासून जागतिक बाजारापेठेत आणि खासकरून शस्त्रांच्या बाजारपेठेत मंदी असतानाही, अमेरिकेने आपला जगाच्या बाजारपेठेतला शस्त्रे विक्री करण्याचा भाग वाढवण्यात यश मिळवले आहे, एवढेच नसून अमेरिका जगाच्या शस्त्रांच्या व्यापारामध्ये एकूण ५३% व्यापार करते. २०११ साली ही विक्री ४६ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी भयंकर मोठी होती."[३४] संरक्षण उद्योग मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पदाधिकारी सदस्यांना ही पैसा पुरवत असते.[३५]
लष्करी-औद्यिगीक संकुलाची संकल्पना आता करमणूक आणि कला संबंधी उद्योगांना सामावून घेण्यासाठीही विस्तारली गेली आहे.[३६] जसे की, मेथ्थ्यू ब्रुम्मर यांनी दाखवून दिले आहे की, जापानच्या मांगा लष्कर आणि संरक्षण मंत्रालय लोकप्रिय संस्कृतीचा वापर करून घरातील वातावरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन घडवण्याचा प्रयत्न करत असते.
संदर्भ
[संपादन]- ^ "military industrial complex". American Heritage Dictionary. Houghton Mifflin Harcourt. 2015. 3 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "definition of military-industrial complex (American English)". OxfordDictionaries.com. 2016-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Definition of Military–industrial complex". Merriam-Webster. 3 March 2016 रोजी पाहिले.
- ^ Roland, Alex (2009-06-22). "The Military-Industrial Complex: lobby and trope". In Bacevich, Andrew J. (ed.). The Long War: A New History of U.S. National Security Policy Since World War II. Columbia University Press. pp. 335–70. ISBN 9780231131599. Unknown parameter
|chapterदुवा=
ignored (सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "What is the Military-Industrial Complex?" (इंग्रजी भाषेत). 2017-02-05 रोजी पाहिले.
- ^ "SIPRI Year Book 2008; Armaments, Disarmaments and International Security" Oxford University Press 2008 आयएसबीएन 9780199548958 pp. 255–56 view on google books
- ^ "The Military–Industrial Complex; The Farewell Address of Presidente Eisenhower" Basements publications 2006 आयएसबीएन 0976642395
- ^ Held, David; McGrew, Anthony G.; Goldblatt, David (1999). "The expanding reach of organized violence". In Perraton, Jonathan (ed.). Global Transformations: Politics, Economics and Culture. Stanford University Press. p. 108. ISBN 9780804736275. Unknown parameter
|chapterदुवा=
ignored (सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Plumer, Brad (January 7, 2013), "America's staggering defense budget, in charts", The Washington Post
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Higgs, Robert (2006-05-25). Depression, War, and Cold War : Studies in Political Economy: Studies in Political Economy. Oxford University Press, USA. pp. ix, 138. ISBN 9780195346084. 3 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Long-term Historical Reflection on the Rise of Military-Industrial, Managerial Statism or "Military-Industrial Complexes"". Kimball Files. University of Oregon. 21 June 2014 रोजी पाहिले.
- ^ Pursell, C. (1972). The military–industrial complex. Harper & Row Publishers, New York, New York.
- ^ Eisenhower, Dwight D. (1987-04). "The Military-Industrial Complex". American Journal of Economics and Sociology (इंग्रजी भाषेत). 46 (2): 150–150. doi:10.1111/j.1536-7150.1987.tb01950.x. ISSN 0002-9246.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ John Milburn (December 10, 2010). "Papers shed light on Eisenhower's farewell address". Associated Press. January 28, 2011 रोजी पाहिले.
- ^ Ledbetter, James (25 January 2011). "Guest Post: 50 Years of the "Military–Industrial Complex"". Schott's Vocab. न्यू यॉर्क टाइम्स. 25 January 2011 रोजी पाहिले.
- ^ Brinkley, Douglas (September 2001). "Eisenhower; His farewell speech as President inaugurated the spirit of the 1960s". American Heritage. 52 (6). 23 March 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2011 रोजी पाहिले.
- ^ Giroux, Henry (June 2007). "The University in Chains: Confronting the Military–Industrial–Academic Complex". Paradigm Publishers. 20 August 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 May 2011 रोजी पाहिले.
- ^ Riefler, Winfield W. (October 1947). "Our Economic Contribution to Victory". Foreign Affairs. 26 (1): 90–103. JSTOR 20030091.
- ^ Mills, C. Wright (2000-02-17). The Power Elite (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 8. ISBN 9780199756339.
- ^ Hayek, F. A., (1976) "The Road to Serfdom", London: Routledge, p. 146, note 1
- ^ Kennan, George Frost (1997). At a Century's Ending: Reflections 1982–1995. W.W. Norton and Company. p. 118.
- ^ Kurth 1999.
- ^ Corporate Warriors: The Rise of the Privatized Military Industry. Ithaca: Cornell University Press, 2003.
- ^ "War Crimes and Imperial Fantasies, Noam Chomsky interviewed by David Barsamian". chomsky.info.
- ^ In On Power, Dissent, and Racism: a Series of Discussions with Noam Chomsky, Baraka Productions, 2003.
- ^ Thompson Reuters Streetevents, 8 December 2015, "L-3 Communications Holding Inc. Investors Conference," p. 3, http://www.l-3com.com/sites/default/files/pdf/investor-pdf/2015_investor_conference_transcript.pdf Archived 2016-04-19 at the Wayback Machine.
- ^ a b c The Intercept, 19 August 2016, "U.S. Defense Contractors Tell Investors Russian Threat is Great for Business," https://theintercept.com/2016/08/19/nato-weapons-industry/
- ^ U.S. House of Representatives Committee on Armed Services, Subcommittee on Oversight and Investigations, 11 May 2016, Testimony of M. Thomas Davis, Senior Fellow, National Defense Industrial Association, "U.S. Industry Perspective on the Department of Defense's Policies, Roles and Responsibilities for Foreign Military Sales," http://docs.house.gov/meetings/AS/AS06/20160511/104900/HHRG-114-AS06-Bio-DavisT-20160511.pdf
- ^ Shindler, Michael (June 22, 2018). "The Military Industrial Complex's Assault on Liberty". The American Conservative. 26 June 2018 रोजी पाहिले.
- ^ http://www.sipri.org/research/armaments/production/recent-trends-in-arms-industry
- ^ Anup Shah. "World Military Spending". October 6, 2010 रोजी पाहिले.
- ^ "Gpoaccess.gov" (PDF). रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-01-07. 2018-07-18 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ Robert Higgs. "The Trillion-Dollar Defense Budget Is Already Here". March 15, 2007 रोजी पाहिले.
- ^ "जगासाठीची शस्त्रांची व्यापारी 'अमेरिका'," Salon, January 24, 2012.
- ^ Jen DiMascio. "Defense goes all-in for incumbents - Jen DiMascio". POLITICO.
- ^ Diplomat, Matthew Brummer, The. "Japan: The Manga Military". The Diplomat. 2016-01-22 रोजी पाहिले.