शुरी किल्ला
शुरी किल्ला 首里城 | |
---|---|
नाहा, ओकिनावा | |
Coordinates | 26°13′1.31″N 127°43′10.11″E / 26.2170306°N 127.7194750°E |
प्रकार | गुसुकु |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित |
चुझान (१४वे शतक – १४२९) रियुक्यू राज्य (१४२९ – १८७९) जपान (१८७९ – १९४५) अमेरि��ा (१९४५ – १९५०) अमेरिका (१९५० – १९७२) जपान (१९७२ – सध्या) |
सर्वसामान्यांसाठी खुले | काही भाग (२०१९ मधील आगीमुळे मुख्य किल्ला बंद आहे) |
परिस्थिती | चार मुख्य संरचना पूर्णपणे नष्ट झाल्या, आजूबाजूच्या संरचना अजूनही शाबूत आहेत[१] |
Site history | |
बांधले | १४वे शतक, अंतिम पुनर्निर्मिती १९५८ - १९९२ |
सध्या वापरात | १४वे शतक – १९४५ |
साहित्य | रियुक्यूअन चुनखडी, लाकूड |
उध्वस्त झालेले | २०१९ मध्ये आग लागुन नष्ट झाला. यापूर्वी ४ वेळा आग लागली होती (१४५३, १६६०, १७०९, १९४५) |
युध्द |
रियुकूचे आक्रमण (१६०९)
|
किल्ल्यात ठेवलेली शिबंदी | |
रहिवासी |
चुझान आणि रियुक्यू चे राजे जपानी शाही लष्कर |
साचा:Infobox Chinese |
शुरी किल्ला (首 里 城 शुरी-ज्यू, ओकिनावन: सुई गुशिकु [२]) हा जपानमधील ओकीनावा प्रांतातील शुरी येथील रियुकुआन गुसुकू किल्ला आहे. १४२९ ते १८७९ च्या दरम्यान ते रियुक्यु राज्याचा राजवाडा होता. त्यानंतर मात्र हा किल्ला फारच दुर्लक्षित झाला. १९४५ मध्ये, ओकिनावाच्या लढाईत, तो जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला होता. युद्धा नंतर, किल्ल्याचा वापर विद्यापीठ परिसर म्हणून उपयोगात आणला गेला. १९९२ पासून, बालेकिल्ला आणि भिंतीं मोठ्या प्रमाणात परत बांधण्यात आल्या. यासाठी ऐतिहासिक दस्तावेज, छायाचित्रे आणि आठवंणीचा आधार घेण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी, किल्ल्याच्या मुख्य अंगणातील इमारती पुन्हा एकदा आगीत नष्ट झाल्या. [३]
इतिहास
बांधकामाची तारीख अनिश्चित आहे, परंतु सॅनझान कालावधी (१३२२ – १४२९) दरम्यान हा किल्ला नक्कीच वापरात होता. असे मानले जाते की हा किल्ला बहुधा ओकिनावाच्या इतर किल्ल्यांप्रमाणेच गुसुकू काळात बांधला गेला होता. जेव्हा राजा शो हाशी याने ओकिनावाच्या तीन प्रमुखांना एकत्र करून रियुक्यु राज्य स्थापन केले तेव्हा त्याने शुरीचा किल्ल्याचा वापर निवास म्हणून केला. [४] त्या वेळी, शूरी राजधानीची भरभराट झाली आणि दुसऱ्या शो राजवंशाच्या काळातही तीची भरभराट कायम राहिली.
१४२९ पासून ४५० वर्षे पुढे, शुरी येथे रियुक्यु राज्याचे शाही दरबार आणि प्रशासकीय केंद्र होते. हा परदेशी व्यापाराचा केंद्रबिंदू, तसेच राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. नोंदीनुसार, हा किल्ला बऱ्याच वेळा जळून खाक झाला आणि प्रत्येक वेळी पुन्हा बांधण्यात आला. शो नेईच्या कारकिर्दीत, सत्सुमाच्या जपानी समुराई सैन्याने ६ मे १६०९ रोजी शुरीला ताब्यात घेतले. [५] त्यानंतर लगेचच जपानी लोकांनी माघार घेतली आणि दोन वर्षांनंतर शो नेईला त्याच्या गादीवर परत आणले, आणि किल्ला आणि शहर रियुक्यु कडे परत गेले. त्याणंतर हे राज्य सत्सुमाच्या अधिपत्याखालीच होते आणि जवळजवळ २५० वर्षे ते त्याच स्थितीत होते.
उतरती कळा
१८५० च्या दशकात कमोडोर पेरीने दोनदा शुरी किल्ल्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही वेळा राजाने भेट नाकारली. [६] १८७९ मध्ये या राज्याला जपानच्या साम्राज्याने आक्रमण करून वेढा दिला आणि शेवटचा राजा शॉ ताई यांना तोक्यो येथे जाण्यास भाग पाडले. १८८४ मध्ये राजाला जपानी खानदानी लोकांमध्ये उच्च दर्जाचे स्थान देण्यात आले. त्यानंतर, इंपिरियल जपानी सैन्याने किल्ल्याचा उपयोग छावणी म्हणून केला. १८९६ मध्ये जपानी सैन्याने येथून माघार घेतली. [७] परंतु त्यापूर्वी किल्ल्याखाली बोगद्यांची आणि गुहांची मालिका तयार केली होती.
१९०८ मध्ये, शुरी शहराने जपान सरकारकडून हा किल्ला विकत घेतला, मात्र त्याच्या नूतनीकरणासाठी त्यांच्याकडे ��िधी नव्हता. १९२३ मध्ये जपानी आर्किटेक्ट इतो चुटाने ओकिनावा श्राइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्फेक्चुरल शिंटो मंदिराचे नाव लावण्यामुळे सीडेन तोडफोडीतून वाचला. १९२५ मध्ये, त्याला राष्ट्रीय ऐतिहासिक वारस्याचा दर्जा त्याला देण्यात आला. त्याच्या ईतक्या पतनानंतरही इतिहासकार जॉर्ज एच. केर यांनी किल्ल्याचे वर्णन “जगातील कोठेही सहज न सापडणाऱ्या भव्य किल्ल्यांपैकी एक आहे” केले आहे कारण त्याच्या आसपास बरीच रिकामी जागा आहे आणि दूरच्या क्षितिजावर समुद्र दिसतो. [८]
संदर्भ
- ^ CNN, Tara John. "Fire breaks out in Japan's Shuri Castle". CNN. 2019-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Oct 31, 2019 रोजी पाहिले.
- ^ "スイグシク". 首里・那覇方言音声データベース (जपानी भाषेत). 2020-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-20 रोजी पाहिले.
- ^ "Shuri Castle, a symbol of Okinawa, destroyed in fire". The Japan Times Online (इंग्रजी भाषेत). 2019-10-31. ISSN 0447-5763. 2019-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-31 रोजी पाहिले.
- ^ Okinawa Prefectural reserve cultural assets center (2016). "発見!首里城の食といのり". Comprehensive Database of Archaeological Site Reports in Japan. 2016-09-02 रोजी पाहिले.
- ^ Turnbull, Stephen (2009). The Samurai Capture a King: Okinawa 1609. Oxford: Osprey Publishing. p. 58. ISBN 9781846034428.[permanent dead link]
- ^ Kerr. pp. 315–317, 328.
- ^ Kerr. p. 460.
- ^ Kerr, George H. (2000). Okinawa: The History of an Island People (revised ed.). Boston: Tuttle Publishing. p. 50.