Jump to content

रुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

रुई किंवा रुचकी ही एक वनस्पति आहे. रुईचे झाड भारत, श्रीलंका, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये आढळते.

जीवशास्त्रीय रचना

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव - (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटकफुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो.

औषधी उपयोग

मूळव्याधीचा मोड, चामखीळ, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवू���, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात.[]पायात काटा/काचेचा बारीक तुकडा/कुसर गेले असता रुईचा चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर व आपोआप बाहेर येतो.[] रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही.

कोविड (2019)चा उपचार :- कफ उर्फ न्युमोनियाचे पॅचेस असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते अशी माहिती :

रुईच्या पानांची पत्रावळ गाईचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला / पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात.हा स्वेदन वा शेकाचा एक प्रभावी उपाय आहे ... HRCT स्कोअर २०/२५ असणाऱ्यांचे देखील patches कमी होतात.

प्रकार

या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला 'मंदार' असेही नाव आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.[ संदर्भ हवा ]

हिंदी-मराठीत कापसालाही रुई म्हणतात.[] पण रुई या वनस्पतीचा आणि कापसाचा (Cottonचा) काही संबंध नाही.

रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.[]

चित्र दालन

अन्य माहिती

रुईचे फळ पिकल्यानंतर जेव्हा ते वाळते, तेव्हा त्याच्यामधून कापसासारखे तंतू बाहेर पडतात. रुईच्या झाडापासून निसटलेले हे तंतू इतस्ततः उडत असतात. रुईच्या या तंतूंपासून (कापसापासून) गाद्या-उश्या बनतात.

संदर्भ

  1. ^ "शरीराला हितकारक". लोकसत्ता दैनिक. ७ ऑगस्ट, इ.स. २०१५. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "शहर शेती : गणपतीची पत्री व तिचे औषधी उपयोग". लोकसत्ता दैनिक. २३ सप्टेंबर, इ.स. २०१५. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "परभणीच्या बाजारात कापसाला भाव, पण शेतकऱ्यांकडे अभाव!". लोकसत्ता दैनिक. २२ डिसेंबर, इ.स. २०१५. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "ऋतुचक्र आणि आरोग्���!". लोकसत्ता दैनिक. २० मार्च, इ.स. २०१५. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)