कोणार्क सूर्य मंदिर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरी पासून ३५ किमी तर भुवनेश्वर पासून ६५ किमी आहे.
वास्तुकला
प्रचंड आकाराची बारा चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे. येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्या सूर्यमंदिरात दिसत नाही. गाभारा व जगमोहन मंदिर यांच्यापुढे नटमंदिर हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत.
पौराणिक महत्त्व
हे मंदिर सूर्य देव यांना समर्पित होते, ज्यांना स्थानिक लोक 'बिरंचि-नारायण' म्हणून संबोधत असत. या कारणामुळे, या प्रदेशास अर्क-क्षेत्र (अर्क=सूर्य) किंवा पद्म-क्षेत्र म्हणले गेले. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब यांना त्याच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. सांब यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोनार्कमध्ये बारा वर्षे तपश्चर्या केली आणि सूर्य देवाला प्रसन्न केले. सूर्यदेव, सर्व रोगांचा नाश करणारा होता. सूर्यदेवांने सांबचा आजार बरा केला होता. त्यानुसार सांबने सूर्य देवाचे मंदिर बांधायचे ठरवले. सांब यांचा आजार बरा झालानंतर, चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली.
ही सूर्यदेवाची मूर्ती शरीराच्या त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनविली होती. सांब यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनमधील मंदिरात ही मूर्ती स्थापित केली, तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले.[१]
चित्रदालन
संदर्भ
- ^ "कोणार्क सूर्य मंदिर". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-08-31.
बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर कोणार्क सूर्य मंदिर (इंग्रजी मजकूर)