Jump to content

इलाही जमादार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली, १ मार्च १९४६, मृत्यू :३१ जानेवारी २०२१) हे एक मराठी गझलकार होते. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत राही. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसे. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असे. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे होते. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली होती.

इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला होता. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेत.

इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने आणि मुशायरे यांत भाग घेतला होता.. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे आणि मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होत असत. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांनी मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

इलाही जमादार यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम

  • युववाणी या कार्यक्रमात त्यांचे काव्यवाचन होत असे.
  • मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यांसारख्या कार्यक्रमांतून इलाही जमादार यांच्या संगीतबद्ध रचनांचे सातत्याने प्रसारण झाले आहे.

दूरचित्रवाणीवरील इलाही यांचा सहभाग

  • दूरदर्शनवरच्या ’आरोही’ या कार्यक्रमात इलाही यांनी स्वरबद्ध केलेली स्वरचित हिंदी गीते प्रसारित झाली आहेत.
  • त्यांच्या मराठी काव्यरचना ’मराठी सुगम संगीत’आणि स्वरचित्र या कार्यक्रमांतून सादर झाल्या आहेत.
  • दूरचित्रवाणीवरच्या सनक, आखरी इन्तजार या काही टेलिफिल्म्सकरिता गीतलेखन
  • एहसास अपने अपने, स्वामी समर्थ, पुलिस भी एक इन्सान है, चलो मछिंदर गोरख आयो या हिंदी मालिकांसाठी गीतलेखन
  • मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपति. या मराठी मालिकांसाठी गीतलेखन.

जाहीर कार्यक्रम

  • इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे.
  • इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम होतात..
  • इलाही यांनी ’जखमा अशा सुगंधी' व ’महफिल-ए-इलाही' या नावांचेे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.

इलाही जमादार यांच्या गीतांच्या ध्वनिफिती

  • मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन)
  • हिंदी अलबम -हिंदी पॉप गीते
  • संगीतिका -
    • हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक.
    • मराठी - स्वप्न मिनीचे
  • नृत्यनाट्ये :
    • हिंदी - नीरक्षीरविवेक
    • मराठी - मी कळी मला फुलायचे. (वरील सर्व संगीतिका व नृत्यनाट्ये ’मनीषा नृत्यालय' द्वारा रंगमंचावर सादर होतात).

इलाही ज़मादार यांचे काव्य/गझल संग्रह

  • अनुराग
  • अनुष्का
  • अभिसारिका
  • गुफ्तगू
  • जखमा अश्या सुगंधी
  • दोहे इलाहीचे
  • भावनांची वादळे
  • मुक्तक

इलाही ज़मादार यांची एक कविता

सांजवेळो सोबतीला, सावली देऊन जा
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा
मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या
त्या खुणांचे ताटवे तू एकदा फुलवून जा
पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा
घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा
यापुढे जमणारना तुज, ओळखीचे, पाहणे
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा
नववधू होऊन तू, जाशील जेव्हा त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा

इलाही ज़मादार यांची काही ध्वनिमुद्रित गीते

  • अंदाज आरशाचा वाटे खरा
  • निशिगंध तिच्या नजरेचा
  • भावनांची वादळें उठली
  • लहरत लहरत बहरत बहरत
  • शीक एकदा खरेच प्रीत

.

बाह्य दुवे

इलाही जमादार - भावनांची वादळे Archived 2008-04-08 at the Wayback Machine.