सहाय्य:संपादन
लघुपथ: विपी:ससं, स:सं, स:संपा
शुद्धलेखन आणि व्याकरण
मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती आहे. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा. Wikipedia:अशुद्धलेखन हा अशुद्ध लेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे.
विकिपीडिया लेखनशैली
विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा विकिपीडियाचा गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय ह्या लेखात उपलब्ध आहे.
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिया लेखनशैली ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बऱ्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ह्यांत अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता कृपया विकिपीडिया:लेखनभाषा संकेत हे सदर पहा.
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब���ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
आंतरविकि संपर्क करू इच्छिणाऱ्या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे.
नमुना मांडणीचे लेख
विकिपीडियातील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील मासिक सदर ह्या विभागात प्रर्दशित केले जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करून आपण विकिपीडियावर लेख कसे लिहावेत ह्याचा अभ्यास करू शकता. विकिपीडियात संपादन करताना काही शंका आल्यास विकिपीडिया:चावडी येथे संपर्क साधावा. विकिपीडियावरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे आहेत-
संपादन कसे करावे ह्याची अधिक माहिती मिळवण्यापूर्वी अजून वाचन करावयाचे असल्यास कृपया विकिपीडिया:सफर येथे जा
विकिभाषेद्वारे संपादन
हा विभाग विकिभाषेचा उपयोग करून विकिपीडियावर संपादने कशी पार पाडावीत याची माहिती देतो. या माहितीचे छ्पाईयोग्य संक्षीप्त टाचण येथे उपलब्ध आहे (ते प्रींट करून सोबत बाळगता येईल किंवा महाविद्यालयात नोटीस बोर्डावर किंवा महाविद्यालयाच्या वार्षीक अंकात अंतर्भूत करता येईल.)
मुख्य लेख सहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन येथे पूर्ण करून हवा आहे त्यास हात भार लावा.
विकिला स्वतःची विशिष्ट लेखन शैली नसली तरी वाचक,लेखक व संपादकांच्या सोयीनुसार काही संकेत आणि विकिसंज्ञा हळू हळू रूढ होत आहेत; उदाहरणार्थ, शीर्षकलेखनाचे संकेत, शुद्धलेखन इत्यादी.
तसेच विकिमध्ये सर्वसामान्यपणे कुणालाही संपादन करता यावे म्हणून संगणकाच्या कळफलकावर सहज उपलब्ध असलेल्या चिन्हांची एक सोपी चिन्हांकित भाषाप्रणाली बनवलेली आहे तिला विकिभाषा किंवा विकि मार्कअप लँग्वेज असेही म्हणतात.
उदाहरणार्थ
तरंगचिन्ह ~ सामान्यपणे कळफलकावरील १ या आकड्याच्या डावीकडे असते. शिफ्टकळ आणि '~' चिन्हाची कळ दाबली असता उपलब्ध होते.
उपयोग- मुख्यत्वे सही करण्याकरता तरंग चिन्ह चारवेळा ~~~~ असे दाबून वापरले असता सदस्याची डिजिटल(डिजिटल शब्दाचा उपयोग येथे बरोबर आहे का नाही याची खात्री करा!) विकिसही आपोआप बनते.
आठ या अंकाच्या डोक्यावरील * हे तारकाचिन्ह आठ हा अंक आणि शिफ्ट कळ सोबत दाबले असता मिळणारे .त्या प्रमाणेच ==== | {{}} [[]] : <> ''' ''' इत्यादी विकिभाषा चिन्हे विकि संपादताना विकिभाषेत कशी वापरली जातात ते आपण येथे पाहू.
शीर्षक
उदाहरण
विकिपीडियात कसे दिसते | जेव्हा तुम्ही असे लिहिता |
---|---|
नवीन विभाग उपविभाग उप-उपविभाग
|
==नवीन विभाग== ===उपविभाग=== ====उप-उपविभाग==== |
केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी). परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो.
|
केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी). परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो. |
तुम्ही ओळींना तोडू शकता
|
तुम्ही ओळींना तोडू शकता<br> अगदी परिच्छेद न बदलता. |
त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.
|
* विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.: ** प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा. *** अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते. **** यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो. * एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते. |
|
# क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात ## पद्धतशीर आणि नेटकेपणाने ## सोप्यारीतीने ### आणि कमीतकमी प्रयत्नांमध्ये |
|
; व्याख्या-यादी : व्याख्यांची यादी ; नग : आणि त्याची व्याख्या ; आणखी एक नग : त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने |
|
* मिश्र-याद्यादेखील बनविता येतात *# आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते *#* जसे की... *#*; आणि व्याख्या-यादी देखील... *#*: हे सर्व *#*; अतिशय *#*: सोप्या पद्धतीने बनवा *#*:* अ *#*:* ब *#*:* क |
आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते. |
: एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो. आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते. |
When there is a need for separating a block of text
This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text. |
<blockquote> The '''blockquote''' command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does. </blockquote> |
(See formula on right):
|
IF a line starts with a space THEN it will be formatted exactly as typed; in a fixed-width font; lines will not wrap; ENDIF |
|
<center>Centered text.</center> |
ही रेषेवरची ओळ आणि ही रेषेखालची
|
ही रेषेवरची ओळ ---- आणि ही रेषेखालची |
सारणी
विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात.
सोपे उदाहरण
{|class=wikitable |पहिले घर, पहिली रांग |दुसरे घर, पहिली रांग |- |पहिले घर, दुसरी रांग |दुसरे घर, दुसरी रांग |}
आणि
{| class=wikitable |पहिले घर, पहिली रांग || दुसरे घर, पहिली रांग |- |पहिले घर, दुसरी रांग || दुसरे घर, दुसरी रांग |}
ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात -
पहिले घर, पहिली रांग | दुसरे घर, पहिली रांग |
पहिले घर दुसरी रांग | दुसरे घर दुसरी रांग |
सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमन्स या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिपीडियावर) चढवावे. मराठी विकिपीडियाचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावीत (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता).
नवा लेख कसा सुरू करावा
नवीन लेख शीर्षकलेखन करण्यापूर्वी आपणास आधीपासून मराठी यूनिकोडात टंकन येत असल्यास उत्तमच, नसेल तर येथील लेखन सुविधा समजून घ्यावी.मराठी विकिपीडियावर सर्व लेख शीर्षके (नावे) मराठी (देवनागरी) लिपीतच असावीत, अन्य लिपीतील लेख नामे वगळली जावीत असा लेखनसंकेत असून त्यामुळे इंग्रजी किंवा इतर लिपीतील शीर्षकनामे तातडीने वगळली जातात हे लक्षात घ्यावे.
मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत.
१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --
जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा. जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील इच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात [[असा]] लिहिल्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर जतन (save) करावा. झाले नवीन पान तयार!
२. शोध करून. ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील.जर आपण शोध घेत असलेले लेखशीर्षक अद्याप अस्तित्वात नसेल तर त्याबरोबर 'मराठी विकिपीडियावर "........." हा लेख लिहा!.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यावर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.
या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे.
जर अजून काही प्रश्न असल्यास विकिपीडिया चावडीवर विचारावेत.
नवा लेख लेख लिहितांना हे कराच
एखादा नवीन लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या.
- लेखाच्या तळाशी
== संदर्भ व नोंदी == <references/>
ही नोंद आहे याची खात्री करून घ्यावी.
- लेखाचे वर्गीकरण करावे. त्यासाठी लेखाच्या शेवटी [[वर्ग:वर्गाचे नाव]] लिहावे.
- त्याऐवजी इंग्लिश (किंवा इतरभाषीय) आंतरविकि दुवा द्यावा. त्यासाठी [[en:Name of the English Article]] असे लिहावे.
नवीन लेख लिहिण्याचा सोपा उपाय
विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.
|
संपादनाविषयी अन्य सहाय्यपाने
- सहाय्य:वर्ग - लेखांच्या वर्गीकरणाविषयी प्राथमिक माहिती.
- सहाय्य:याद्या - लेखांमध्ये याद्या अंतर्भूत कशा कराव्यात?
हेसुद्धा पाहा
- विकिपीडिया:टाचण
- व्हिडियो 1
- व्हिडियो 2
- व्हिडियो 3
- व्हिडियो ४
- गुगल सादरीकरण मराठीतून
- विकिपीडिया:निर्वाह
- विकिपीडिया:पहारा आणि गस्त
- विकिपीडिया:Input System
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून तुमचा वेळ वाचवा.
- मदतकेंद्र
- विकिपीडिया साहाय्य:नेहमीचे प्रश्न
- विकिपीडिया संदर्भ सूची
- विकिपीडिया मदत सूची
- मराठीत कसे वाचाल?
- मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने
- सहाय्य:संपादन कालावधी
- विकिपीडीया:जादुई शब्द