हळद्या
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.(ameya Manvilkar is great boy)
नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.
हळद्याचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थित विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.
चित्रदालन
-
एक थोराड नर-हळद्या
-
हळद्या
-
हळद्याची अंडी
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |