फिल्मफेर पुरस्कार

(फिल्मफेअर पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

फिल्मफेर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेर अवॉर्ड्‌स असे झाले.

फिल्मफेर पुरस्कार
प्रयोजन चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार इ.स. १९५४
संकेतस्थळ http://www.filmfare.com/

१९५६ सालापासून फिल्मफेर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

पुरस्कार

संपादन

लोकप्रीय पुरस्कार

संपादन
श्रेणी सुरुवात सर्वाधिक विजेता टिप्पणी
सर्वोत्तम चित्रपट १९५४
सर्वोत्तम दिग्दर्शक १९५४ बिमल रॉय
(७ वेळा)
सर्वोत्तम अभिनेता १९५४ दिलीपकुमारशाहरुख खान
(८ वेळा)
सर्वोत्तम अभिनेत्री १९५४ नूतन, काजोलआलिया भट्ट
(५ वेळा)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता १९५५ अनिल कपूर
(४ वेळा)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री १९५५ निरूपा रॉय, फरीदा जलाल, जया बच्चन,
राणी मुखर्जीसुप्रिया पाठक
(३ वेळा)
सर्वोत्तम पदार्पण अभिनेता १९८९
सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री १९८९
सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक २०१०
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक १९५४ ए.आर. रहमान
(१० वेळा)
सर्वोत्तम गीतकार १९५९ गुलजार
(१३ वेळा)
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक १९५९ किशोर कुमार
(८ वेळा)
१९६८ पासून पुरुष व महिला वेगळे
सर्वोत्तम महिला पार्श्वगायक १९५९ आशा भोसलेअलका याज्ञिक
(७ वेळा)
१९६८ पासून पुरुष व महिला वेगळे
सर्वोत्तम विनोदी भूमिका १९६७ अनुपम खेर
(५ वेळा)
२००८ पासून बंद
सर्वोत्तम नकारात्मक भूमिका १९९२ आशुतोष राणानाना पाटेकर
(२ वेळा)
२००८ पासून बंद

समीक्षक पुरस्कार

संपादन
श्रेणी सुरुवात सर्वाधिक विजेता टिप्पणी
सर्वोत्तम चित्रपट (समीक्षक) १९७९
सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) १९९८ अमिताभ बच्चन
(४ वेळा)
सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) १९९८ तब्बू
(६ वेळा)
सर्वोत्तम माहितीपट १९६७ १९९८ पासून बंद

तांत्रिक पुरस्कार

संपादन
श्रेणी सुरुवात सर्वाधिक विजेता टिप्पणी
सर्वोत्तम कथा १९५५ मुखराम शर्माअनुभव सिन्हा
(३ वेळा)
सर्वोत्तम पटकथा १९६९ सलीम-जावेद, बासू चॅटर्जीराजकुमार हिरानी
(३ वेळा)
सर्वोत्तम संवाद १९५९ गुलजार
(४ वेळा)
सर्वोत्तम ॲक्शन[मराठी शब्द सुचवा] १९९३ शाम कौशल
(५ वेळा)
सर्वोत्तम कला दिग्दर्शन १९५६ एम.आर. आचरेकर, सुधेंदू रॉय, शांती दास, अजित बॅनर्जी,
शर्मिष्ठा रॉय, नितीन चंद्रकांत देसाई, सुब्रत चक्रवर्ती
आणि अमित रे
(३ वेळा)
सर्वोत्तम पार्श्वसंगीत १९९८ ए.आर. रहमान
(४ वेळा)
सर्वोत्तम छायाचित्रण १९५४ कमल बोस
(५ वेळा)
सर्वोत्तम संकलन १९५६ अक्किनेनी श्रीकर प्रसाद
(४ वेळा)
सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन १९८९ सरोज खान
(८ वेळा)
सर्वोत्तम ध्वनीमुद्रण १९५५ बिश्वदीप चॅटर्जी
(४ वेळा)
सर्वोत्तम विशेष प्रभाव २००७ रेड चिलीज व्ही.एफ.एक्स.
(५ वेळा)
सर्वोत्तम वेषभूषा १९९५ डॉली आहलूवालिया
(३ वेळा)

विशेष पुरस्कार

संपादन
श्रेणी सुरुवात सर्वाधिक विजेता टिप्पणी
जीवनगौरव १९९१
फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार १९९५
फिल्मफेर विशेष पुरस्कार १९७२
सर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा] १९९८ २०१२ पासून बंद
पावर पुरस्कार २००३ २००७ पासून बंद

विक्रम

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन