इंडिया गेट
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना एडविन लुटयेन्स यांन��� केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्लिश: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्लिश: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.
इंडिया गेट | |
---|---|
राष्ट्रीय स्मारक | |
स्थान | नवी दिल्ली, दिल्ली, भारत |
निर्मिती | इ.स.१९३१ |
वास्तुविशारद | एडविन लुटयेन्स |
वास्तुशैली | आधुनिक शैली |
प्रकार | सांस्कृतिक |
देश | भारत |
खंड | आशिया |
सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सद्ध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.