आंध्र प्रदेश

भारतातील एक राज्य.
(आंध्रप्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

आंध्रप्रदेश (तेलुगू- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे.

  ?आंध्र प्रदेश
तेलुगू- ఆంధ్ర ప్రదేశ్


भारत
—  राज्य  —
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश
Map

१६° ३०′ ५०.४″ N, ८०° ३०′ ५९.३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,६०,२०५ चौ. किमी
राजधानी अमरावती
मोठे शहर विशाखापट्टणम
जिल्हे 26
लोकसंख्या
घनता
४,९६,६५,५३३ (५ वे) (२०११)
• ३०७.८/किमी
भाषा तेलुगू
राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) विधानसभा व विधान परिषद (१७६+५८)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AP
संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ

इतिहास

संपादन

१ नोव्हेंबर इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला, मराठी भाषकांचा प्रदेश महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश कर्नाटकाला जोडला गेला.

२ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. प्रारंभी काही काळ हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर अमरावती या सुनियोजित राजधानीची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसविली.

भूगोल

संपादन
  • आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
  • राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  • आंध्र प्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२° उत्तर व रेखांश- ७७° ते ८४°४०' पूर्व या सीमांमध्ये वसलेला आहे.
  • राज्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ३०८ इतकी आहे.

चतुःसीमा

संपादन

जिल्हे

संपादन

यावरील विस्तृत लेख येथे पहा.

आंध्र प्रदेशमध्ये 26 जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -

राज्यातील पर्यटनस्थळे

संपादन

चारमिनार

संपादन
मुख्य लेख: चार���िनार
 
चारमिनार

चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पद्धतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.

तिरुपती

संपादन
मुख्य लेख: तिरुपती
 
बालाजीचे विख्यात मंदिर

तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन

संपादन
 
श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुनमंदिर

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.

एथिपोथला धबधबा

संपादन
 
एथिपोथला धबधबा

राज्याची प्रतिके

संपादन
राज्य प्रतिके आंध्र प्रदेश
प्रतीक
 
कलश
भाषा तेलुगू
गीत मा तेलुगू तल्लीकी
नृत्य
 
कुचिपुडी
प्राणी
 
काळवीट
पक्षी
 
चास
फुल
 
वॉटर लिली
वनस्पती
 
कडुनिंब
खेळ
 
कबड्डी

आंध्र प्रदेशावरील पुस्तके

संपादन
  • स्वागतशील शेजारी आंध्र प्रदेश (श्रीनिवास गडकरी)

बाह्य दुवे

संपादन