डिसेंबर १२
Appearance
(१२ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४५ वा किंवा लीप वर्षात ३४६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सातवे शतक
[संपादन]- ६२७ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसऱ्याच्या पर्शियन सैन्याला हरविले.
अकरावे शतक
[संपादन]- १०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.
अठरावे शतक
[संपादन]- १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा निकोबार बेटांमध्ये प्रवे केला.
- १७१९ - बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
- १७८१ - अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
- १७८७ - पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.
विसावे शतक
[संपादन]- १९०१ - न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
- १९११ - ब्रिटिश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
- १९२५ - इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
- १९३९ - हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
- १९४१ - ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९६३ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९६४ - जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७९ - ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
- १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
- २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
- २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म
[संपादन]- १२९८ - ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
- १५७४ - डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
- १८९२ - गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’’धूमकेतू’’, गुजराती कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
- १९०२ - अ. ना. भालेराव, संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक.
- १९०५ - डॉ. मुल्कराज आनंद, हिंदी लेखक.
- १९०७ - खेमचंद प्रकाश, भारतीय संगीतकार
- १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी,केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- १९४१ - गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी,केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
- १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
- १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रॅंक्सचा राजा.
- १५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
- १६८५ - जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
- १८४३ - विल्यम पहिला, नेदरलॅंड्सचा राजा.
- १९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
- १९६४ - मैथिलिशरण गुप्त, हिंदी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
- १९९१ - दत्तात्रय गण���श तथा अप्पासाहेब शेंबेकर, शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६)
- १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
- १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- २००० - जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल, कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ ऑक्टोबर १९९९)
- २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.
- २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माते
- २०१५ - शरद जोशी, महाराष्ट्रातील शेतकरी नेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- केन्या - स्वातंत्र्य दिन.
- स्वदेशी दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - (डिसेंबर महिना)