Jump to content

भोपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोपाल या पानावरून पुनर्निर्देशित)

भोपाळचे वार्षिक सरासरी तपमान

  ?भोपाळ

मध्य प्रदेश • भारत
—  राजधानी  —
Map

२३° १५′ ००″ N, ७७° २५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३०८.१४ चौ. किमी
• ४२७ मी
जिल्हा भोपाळ
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१७,९८,२१८[] (१६व्या) (२००१)
• १६०/किमी
• १९,१७,०५१
भाषा हिंदी भाषा
महापौर सुनिल सुद
आयुक्त निकुंज श्रीवास्तव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 462001
• +०७५५
• INBHO
• MP-04
संकेतस्थळ: भोपाळ महानगरपालिका संकेतस्थळ

भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.

इतिहास

[संपादन]

भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या गडबडगोधळात जेव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली. नबाबांच्या या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले. भोपाळ राज्याची स्थापना परमार राजा भोजाने सन १०००-१०५५ दरम्यान केली. त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राजांनंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. इसवी सन १७२०-२६ मध्ये दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्लेबंदी करून याला एका शहरात रूपांतरित केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्याची स्थापना झाली. मुगल दरबारामधील सिद्दिकी बंधूंबरोबर मैत्रीच्या निमित्ताने खानाने हैदराबादच्या मीर कमरुद्दीनबरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दिकी बंधूंबरोबर निपटारा केल्यावर १७२३मध्ये निजामाने भोपाळ राज्यावर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खानला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८मध्ये ब्रिटिश हुकुमतीबरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तानला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतानला उत्तराधिकारी घोषित केले गेले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.

म्हण : कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली?

[संपादन]

मध्यप्रदेशात भोपाळपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवले त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत. भोज राजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती.

असे म्हणतात की मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ हे एके काळी "भोजपाल" म्हणून ओळखले जाई.

भोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता, राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव "भोपाल" पडले. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच बड्या तलावापाशी भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या. त्यातली एक म्हणजे भोजशाळा. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीचीसुद्धा स्थापना केली होती, जी आज लंडनमध्ये आहे.

पण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली " या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती.

"गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग"
गंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग

गंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय. या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नगरीवर आक्रमण केले होते. एकत्र येऊनसुद्धा भोजराजाला ते हरवू शकले नव्हते. त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली.

[[File:Gol ghar bhopal.jpg|

  1. thumb|गोळघर]

भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत.

दळणवळण

[संपादन]

भोपाळ देशातील बऱ्याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.

वायुमार्ग

[संपादन]

भोपाळचा राजा भोज विमानतळ शहरापासून 12 किमी अंतरावर आहे. दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई, चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, रायपूर येथून एर इंडिया आणि इतर खासगी विमान कंपन्यांची नियमित उड्डाणे सेवा आहेत.

रेल्वेमार्ग

[संपादन]

भोपाळचे रेल्वे स्थानक देशातील विविध रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे. हे रेल्वेस्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर येते. शताब्दी एक्सप्रेस भोपाळला थेट दिल्लीशी जोडते. तसेच, हे शहर मुंबई, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, उज्जैन, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद इत्यादी अनेक गाड्यांद्वारे जोडले गेले आहे.

रस्ता

[संपादन]

सांची, इंदूर, उज्जैन, खजुराहो, पंचमाडी, जबलपूर इत्यादी शहरांमधून भोपाळ सहज जाता येते. भोपाळ येथे नियमितपणे मध्य प्रदेश आणि शेजारच्या अनेक शहरांमधून प्रवास करतात.

अर्थव्यवस्था

[संपादन]

जुन्या शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये विद्युत वस्तू, औषधी, कापूस, रसायने आणि दागिने आहेत. इतर उद्योगांमध्ये सूती आणि कपड्यांचे विणकाम, पीठ गिरणी आणि चित्रकला, तसेच क्रीडा उपकरणे यांचा समाविष्ट आ��ेत.

आगगाडी

[संपादन]

विमानसेवा

[संपादन]

भोपाळ विमानतळापासून मुंबईदिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.

भूमार्ग

[संपादन]
कुशाभाऊ ठाकरे आंतरराज्यीय बस अड्डा (संपूर्ण दृश्य)

विशेष

[संपादन]

३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादी स्वरूपांमध्ये शिल्लक आहे.

पर्यटन

[संपादन]

छोटा तलाव, मोठा तलाव, भीमा सितका, अभयारण्य, शहीद भवन आणि भारत भवन येथे पाहण्यासारखे आहे. भोपाळजवळील सांची स्तूप हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे, जे युनेस्कोद्वारे संरक्षित आहे. भोपाळपासून सुमारे 24 कि.मी. अंतरावर असलेले भोजपूर मंदिर हे ऐतिहासिक दर्शनीय स्थळ आहे. बरखेडा येथील भेल येथील श्री राम मंदिर हे एक प्रसिद्ध विश्वास केंद्र आहे.

भोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
  • वनविहार : मोकळ्या जागेत राहणारे जंगली प्राणी आणि पक्षी पहाता येतील असे ठिकाण
  • भोपाळच्या नवाबांचे वाडे/राजवाडे/महाल
  • सैरसपाटा (एक उत्तम निगा राखलेले उद्यान)
  • कालियासोत, केरवा, भदभदा आणि इतर पाच-सहा धरणे
  • भोपाळचा बडा तलाव (आणि छोटा तलाव) आणि मोतिया तलाव वगैरे अनेक तलाव.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आणि इतर ३-४ संग्रहालये
  • मोती मशीद आणि इतर ३-४ मशिदी
  • ताज उल मस्जिद - यह भारत की विशाल मस्जिदों में से एक हैं।
  • भारत भवन, वगैरे.
  • लक्ष्मीनारायण मंदिर, भोपाळ भोपाळच्या अरेरा टेकडीवर पाच दशकांपूर्वी स्थापन केलेले बिर्ला मंदिर अनेक वर्षांपासून धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरात स्थापित भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीजीच्या मूर्ती भक्तांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. ७-८ एकर डोंगराळ प्रदेशात पसरलेल्या या मंदिराची प्रतिष्ठा देश आणि राज्यातील विविध शहरांमध्ये पसरली आहे.

भोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणे

[संपादन]
  • सांचीचा स्तूप (भोपाळपासून ४५ किलोमीटरवर)
  • विदिशा (सांचीपासून ९ किलोमीटरवर) : येथे ग्रीक राजा ॲन्टिअल्किडासचा दूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे.
  • उदयगिरी गुंफा (विदिशापासून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी) : येथील भूवराहाचे देऊळ आणि दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख.
  • भीमबेटका (भोपाळच्या दक्षिणेला ४५ किलोमीटरवर) : येथील गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आहेत.
  • भोजपूर गाव (भीमबेटकाच्या दक्षिणेला २५ किलोमीटरवर) : येथे भोजेश्वर महादेवाच्या अतिपुरातन देवळात १८ फूट उंचीची शंकराची पिंडी आहे.

भोपाल वार्षिक सरासरी तापमान

  1. ^ "Bhopal District Census Handbook" (PDF). Office of the Registrar General & Census Commissioner. 7 August 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 10 June 2016 रोजी पाहिले.