पिंपळगाव (बसवंत)
?पिंपळगाव बसवंत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | निफाड |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पिंपळगाव बसवंत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]पिंपळगाव (बसवंत) हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर पराशरी नदीच्या काठावरील एक मध्यम शहर आहे. पाराशरी नदी किनारी फार जून राम मंदिर तसेच हनुमान मंदिर आहे तेथे नुकतेच जुलै २०२१ महिन्यात उत्खनन केले असून त्यात दोनशेहून अधिक जुने पाच सहा घाट सापडेल आहेत येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जवळचं तालुक्याचे ठिकाण निफाड शहर आहे. तसेच मिग विमानांचा कारखाना असलेले ओझर देखील येथून जवळच आहे. मुंबई-आग्रा महामार्गा वरील ह्या शहरास व्यापारी महत्त्व आहे.
पिंपळगाव बाजार समिती
[संपादन]पिंपळगाव ही बाजार समिती नवीन स्थापनेपुर्वी सुद्धा वाजारपेठ होती. बाजारपेठ म्हणून तिचा नावलौकिक होती नाशिक जिल्हा कांदा, टोमॅॅटो व द्राक्ष हया नगदी पिकांच्या उत्पादनासाठी अग्रेसर आहे.पिंपळगाव कॄषी समितीचे कार्यक्षेत्र हे पिंपळगाव तालुक्यातील काही गावांसाठी आहे. दरवर्षी मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतीमालाची वाढती आवक ही पिंपळगाव बाजार समितीच्या कामाची पावती आहे.कॄषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण भागांमधील लोकांची विश्वासपात्र अशी नामांकित बाजारपेठ बनली आहे.या बाजार समितीने व्यापारी व कामगार बाजरपेठेचा केंद्रबिंदू मानली आहे.शेतक–यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा त्यांची आर्थिक फसवणुक होऊ नये या उद्देशाने या बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे.बाजार समितीमुळे पिंपळगाव परिसर समॄद्ध झाला आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]बुद्ध विहार राम मंदिर
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]ओझर,मुखेड ,अंतरवेली ,पाचोरे वनी ,��िरवाडे वनी,कारसुल,बेहेड ,नारायण टेंभी ,उंबरखेड ,चिंचखेड, रानवड ,नांदूर्डी,आहेरगाव ,कोकणगाव ,साकोरे मिग ,शिरसगाव,वडाळी नजीक ,रेडगाव ,सावरगाव